कानंद मावळ

(कानद मावळ या पानावरून पुनर्निर्देशित)

श्रीमंत छत्रपती शिवाजी राजाचे मावळे म्हणजे सैनिक पुणे जिल्ह्याच्या ज्या भागातून आले त्या भागाला मावळ प्रांत असे म्हटले जाई. या तथाकथित मावळप्रांताचे बारा भाग आहेत. त्यांना बारा मावळ असे म्हणतात. त्यांची नावे अशी :

 1. पवन मावळ
 2. हिरडस मावळ
 3. गुंजन मावळ
 4. पौड खोरे
 5. मुठा खोरे
 6. कानद खोरे
 7. मुसे खोरे
 8. वळवंड खोरे
 9. रोहिड खोरे
 10. अंदर मावळ
 11. नाणे मावळ
 12. कोरबारसे मावळ.

कानंद मावळ हे त्यांतले सहावे. या भागातून कानंदी नदी उगम पावते आणि वाहते म्हणून त्याला कानंद मावळ म्हणतात. कानंद मावळाच्या सीमेवर तोरणा हा किल्ला आहे. कादवे व भट्टीची ह्या खिंड, तर देवराई अशी ठिकाणे आहेत.