काकड आरती
काकड आरती म्हणजे हिंदू धर्मात देवाला उठवण्यासाठी पहाटेच्या वेळी केलेली आरती होय.[१] या वेळी देवाच्या मूर्तींला काकडयाने (एक प्रकारची ज्योत) ओवाळले जाते, म्हणून याला काकडारती असे म्हणतात.[२] भारतातील अनेक मंदिरांमध्ये पहाटे काकड आरती केली जाते. महाराष्ट्रामध्ये बहुतांशी मंदिरातून नित्य किंवा काही विशिष्ट काळात, विशेषतः कार्तिक महिन्यात काकड आरती केली जाते.[३]
स्वरूप
संपादनकार्तिक महिन्याच्या शुक्ल एकादशीपासून त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत दररोज पहाटे देवाला जागविण्यासाठी मंदिरात काकडारती करण्याची पद्धत प्रचलित आहे.[२] आरतीनंतर विविध भजने, अन्य आरती व स्तोत्रे म्हटली जातात.[४] कृष्णाच्या लीला वर्णन करणारी गीतेही यामध्ये म्हटली जातात.[५] संत तुकाराम, संत रामदास, संत एकनाथ, इत्यादी संतांनी काकड आरती रचल्या आहेत.[६]
अन्य उपक्रम
संपादनकाकड आरतीचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्यात विविध गावांमध्ये विविध उपक्रम केले जातात.[७] काही ठिकाणी कार्तिक महिन्यात रथोत्सवासाठी गावकरी एकत्र जमतात आणि सोहळ्याचा आनंद घेतात.[८]
चित्रफीत
संपादनकाकड आरतीचा नमुना
संपादन- भक्तिचिये पोटी बोध काकडा ज्योति |
पंचप्राण जीवे - भावे ओवाळू आरती ||१||
ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथा |
दोन्ही कर जोडोनि चरणी ठेविला माथा ||२||
काय महिमा वर्णू आता सांगणे ते किती |
कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती ||३||
राही रखुमाबाई दोन्ही उभ्या दो बाही
मयुरपिच्छ चामरे ढाळीती ठाईच्या ठाई ||४||
विटेसहित पाऊले जीवे भावे ओवाळू |
कोटी रवी - शशी जैसे दिव्य उगवले हेळू ||५||
तुका म्हणे दीप घेऊनी उन्मनीत शोभा |
विटेवरी उभा दिसे लावण्यगाभा ||६||[६]
- सत्त्व-रज-तमात्मक काकडा केला|
भक्ति स्नेहे युक्त ज्ञानाग्नीवर चेतविला||[६]
चित्रदालन
संपादन-
काकडा ज्योतीने आरती
-
भाविक अभंग सादर करताना
-
काकडा विशेष गंध
-
काकडा आरती विशेष पूजा
-
त्रिपुरारी पौर्णिमा
संदर्भ
संपादन- ^ "कार्तिक शुद्ध एकादशीपासून त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत काकड आरतीचा प्रासादिक अनुभव जरूर घ्या!". लोकमत. 2022-11-02. 2022-11-12 रोजी पाहिले.
- ^ a b "विठ्ठल मंदिराच्या काकड आरतीला १५० वर्षांची परंपरा". सकाळ. ३.११.२०१९. १४.१२.२०१९ रोजी पाहिले.
|access-date=, |date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ Dasarā-Divāḷī. Mahārāshṭra Śāsana Śikshaṇa Vibhāga, Mahārāshṭra Rājya Lokasāhitya Samitīsāṭhī. 1990.
- ^ [https://www.dainikprabhat.com/pune-district-various-programs-in-taluka-to-mark-the-end-of-kakad-aarti/ "पुणे जिल्हा: काकड आरती समाप्तीनिमित्त तालुक्या�"]. दैनिक प्रभात. 2023-11-30. 2023-12-07 रोजी पाहिले. replacement character in
|title=
at position 47 (सहाय्य) - ^ "काकड आरती सोहळ्याला वडगावात उत्साहात सुरू". सकाळ. 2022-11-12 रोजी पाहिले.
- ^ a b c Gokhale, Mahādeva Vināyaka (1967). Marāṭhī āratī. Sāvitrī Prakāśana.
- ^ "काकड आरती समाप्तीचा नऱ्हे येथे रंगला सोहळा". सकाळ. 2023-11-28. 2023-12-07 रोजी पाहिले.
- ^ "अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठा कार्तिक रथोत्सव". सकाळ. 2022-11-12 रोजी पाहिले.