कहार समाज. कहार समाज ही भारतातील एक भटकी जमात आहे. महाराष्ट्रातील सरकारी नोंदीनुसार जातीच्या परिशिष्टात भटक्या जमाती ब मधे या जातीची नोंद आहे. परिशिष्टातील भोई या मुख्य प्रवर्गातील उपप्रवर्गात एकूण पंचवीस जाती आहेत. झिंगा भोई परदेशी भोई राजभोई भोई कहार गोदिया कहार धुरिया कहार किरट मछुआ मांझी जातीया केवट धीवर धिवर ढिमर पालेवार माचेन्द्रा नावाडी मलहार मल्लाव बोई गाढव भोई खाडीभोई खरे भोई ढेवरा अशा जाती आहेत.


कहार या शब्दाची व्युतपत्ती स्कंधहार या शब्दापासून झालेली दिसते. खांद्यावर भार वाहणारा तो कहार कहार समाजाचा मुख्य व्यवसाय डोली उचलणे हा होता. राजा राणी यांच्या पालख्या उचलणारा हा समाज. चलो रे डोली उठावो कहार पिया मिलन की रुत आयी या गीतामधूनही डोली उचलण्याचे काम करत असावा असे दिसते. बुंदेलखंडातून हा कहार समाज देशभर विखुरला गेला आणि पुढे नदी तलावाच्या काठी या कहार समाजाने निवास केला आणि मासेमारी हे काम कहार समाजाचा मुख्य व्यवसाय झाला. नदीकाठी राहील्याने वाडी लावणे म्हणजे टरबूज खरबूज काकड्या खिरे अशी वाळुपात्रातील वेलीफळ त्यांनी घ्यायला सुरुवात केली. आज हा समाज मुख्यकरून मासेमारी वाड्या लावणे, आणि बाजारहाट करतांना आजही दिसतो. समाजातील काही लोक उच्चशिक्षित असले तरी अजूनही अधिकाधिक समाज हा मासेमारीवर अवलंबून आहे.


कहार बोली

संपादन
Look up कहार समाज in
Wiktionary, the free marathi dictionary.
कहार समाज ह्या बोलीभाषेची शब्दसूची
विक्शनरी, या मुक्त शब्दकोशात पाहा/तपासा/अद्याप नसलेले शब्द/वाक्यांश जोडा अथवा सूची:मराठी बोलीभाषातील शब्द येथे मराठी बोलीभाषांची सामायिक शब्दसूची पहा

बोली कहार समाजाची वेगळी अशी लेखनाची लिपी नाही. मात्र बोली वेगळी आहे. हिंदीचा प्रभावही या बोलीवर दिसतो. जिल्हा, तालुके, खेडी, शहर, विभाग अशा वेगवेगळ्या प्रदेशांचा प्रभावामुळे बोलीही वेगवेगळी दिसून येते.


कहार बोली शब्द.

  • मोहे = मला.
  • तोहे = तुला.
  • मोरो = माझं
  • तोरो = तुझं
  • कायखे = कशाला
  • ब्याव्ह = लग्न

लग्नपद्धती

लग्नगीते हळदीची गाणी

म्हणी

जात्यावरची गाणी