कवियूर पोन्नम्मा (१० सप्टेंबर, १९४५ - २० सप्टेंबर, २०२४) ह्या एक भारतीय अभिनेत्री होत्या. त्यांनी प्रामुख्याने मल्याळम चित्रपट आणि दूरचित्रवाहिनी मालिका मध्ये काम केले. चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी पोन्नम्मा यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात नाटकांमधून केली. पोन्नम्मा यांनी मालिका व्यतिरिक्त जाहिरातींमध्ये देखील काम केले. काही चित्रपटांमध्ये त्यांनी पार्श्वगायन देखील केले. पोन्नम्माचे पती मनिस्वामी यांचे २०११ मध्ये निधन झाले. २० सप्टेंबर २०२४ रोजी पोन्नम्माचे कोची, केरळ येथे प्रकृतीच्या कारणाने निधन झाले.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ "Actress who made a mark with her mother roles; Kaviyoor Ponnamma no more". Kerala Kaumudi.