कविता मुरुमकर
कविता मुरुमकर (१७ मार्च, इ.स. १९७७) या मराठी भाषेतील एक कादंबरीकार आणि कवयित्री आहेत.
कविता मुरुमकर | |
---|---|
जन्म नाव | कविता नील |
जन्म |
१७ मार्च १९७७ सोलापूर |
शिक्षण | एम.ए., नेट, बीएड |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
साहित्य प्रकार | कादंबरी, कविता, समीक्षा |
विषय | मराठी साहित्य |
प्रसिद्ध साहित्यकृती | मी सावित्री ज्योतिराव |
वडील | राजाराम नील |
आई | रसिका नील |
पती | डॉ. दत्तात्रय मुरुमकर |
अपत्ये | तन्वी, अन्वी |
पुरस्कार | सावित्री पुरस्कार २०१३ |
जन्म आणि शिक्षण
संपादनकविता मुरुमकर यांच्या वडिलांचे नाव राजाराम नील आहे. पतीचे नाव दत्तात्रय मुरुमकर आहे. कविता मुरुमकर यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण सोलापूर जिल्ह्यातच झाले. कवितेतील मिथक या विषयावरती त्यांचे विशेष संशोधन आहे.
प्रकाशित लेखन
संपादनत्यांचे सुरुवातीचे लेखन 'कविता नील' या नावाने प्रकाशित झाले आहे. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांचा कवितासंग्रह प्रकाशित झाला. वसंत कानेटकर यांनी त्या संग्रहाविषयी प्रशंसापर उद्गार काढले होते.[ संदर्भ हवा ]
कवितासंग्रह
संपादन- तुझीच कविता (चारोळीसंग्रह)
- मी राधा (कवितासंग्रह)
कादंबरी
संपादन- भैरवी (कादंबरी)
- मी सावित्री जोतिराव (चरित्रात्मक कादंबरी)
पुरस्कार
संपादनकविता मुरुमकर यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते सावित्री पुरस्कारदेऊन २०१३ साली त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. प्रसाद बन साहित्य पुरस्कार, भारतीय जैन संघटना पुणे यांचा क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले साहित्य पुरस्कार, धोंडिराम माने साहित्य पुरस्कार, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा सह्याद्री पुरस्कार, रा. ना. पवार साहित्य पुरस्कार, नारायण सुर्वे काव्यपुरस्कार इत्यादी पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
इतर
संपादनकविता मुरुमकर यांनी सोलापूर सकाळ साठी स्तंभलेखन केले आहे. 'बाई समजून घेताना', ही त्यांची लेख मालिका विशेष लोकप्रिय आहे.