कवटीला इंग्लिश भाषेत Skull असे म्हणतात.एकूण कवटीमध्ये ७ भाग असते ,२ डोळे ,२ नाकपुड्या ,२ कानाचे छिद्र ,१ तोंड असे भाग असते;हाडांची रचना आहे जी कशेरुकामध्ये डोके जोडले

मानवी कवटी

हे चेहऱ्याच्या संरचनेचे समर्थन करते आणि मेंदूला एक संरक्षक पोकळी प्रदान करते. कवटी दोन भागांनी बनलेली आहे: क्रॅनियम आणि अनिवार्य. मानवांमध्ये, हे दोन भाग न्यूरोक्रॅनिअम आणि व्हिसेरोक्रॅनिअम किंवा चेहराचा सांगाडा आहेत ज्यामध्ये त्याचे सर्वात मोठे हाड म्हणून अनिवार्य आहे. कवटी हा सांगाडाचा सर्वात आधीचा भाग बनतो आणि मेंदूची निगा राखतो आणि डोळे, कान, नाक आणि तोंड अशा अनेक संवेदी संरचना बनवतात. मानवांमध्ये या संवेदी रचना चेहऱ्याचा सांगाडाचा भाग आहेत.

कवटीच्या कार्यात मेंदूचे संरक्षण, डोळ्यांमधील अंतर निश्चित करणे, स्टिरिओस्कोपिक व्हिजनला परवानगी देणे आणि कानांची स्थिती निश्चित करणे आणि आवाजांचे दिशांचे स्थानिकीकरण आणि अंतराचे अंतर निश्चित करणे समाविष्ट आहे. शिंगेयुक्त उंग्युलेट्ससारख्या काही प्राण्यांमध्ये, कवटीला शिंगांना माउंट (पुढच्या हाडांवर) पुरवून बचावात्मक कार्य देखील केले जाते.[]

मनुष्य आणि इतर पृष्ठवंशीय प्राण्यांच्या डोक्याच्या सांगाड्याला कवटी म्हणतात. स्तनी, पक्षी, सरीसृप आणि उभयचर या वर्गांतील प्राण्यांची कवटी हाडांची बनलेली असून, त्या सर्वांच्या कवटीची सर्वसाधारणपणे संरचना सारखीच असते. कवटीच्या संरचनेचा तपशील व विविध अस्थींचे आकार यांमध्ये मात्र फरक असतो. मानवी कवटी हाडांची बनलेली असून ती बंद पेटीसारखी असते. कवटीच्या मागील भागामध्ये ती पाठीच्या कण्याशी वरच्या भागाशी जोडलेली असते. पुढच्या बाजूला मध्यभागी नाक, त्याच्या दोन्ही बाजूंस डोळे आणि कान यांसाठी विवरे असतात. मानवी कवटीमध्ये अनेक अस्थी एकमेकींमध्ये करवतीसारख्या दातांनी गुंतविल्यासारख्या असतात. त्यांच्यामध्ये काहीही चलन होत नाही. या गुंतविलेल्या अस्थिसंधींना शिवण म्हणतात. कवटीचा वरचा व बाहेरचा भाग अंडाकृती असून त्यावर इंग्रजी टी या अक्षराच्या आकाराच्या तीन शिवणी असतात. या शिवणी जेथे मिळतात तो भाग बाळाच्या जन्माच्या वेळी मऊ व लिबलिबीत असतो. याला टाळू म्हणतात. टाळू पुढे अस्थिमय होऊन एक ते दीड वर्षांमध्ये टणक होते. याला टाळू भरणे म्हणतात. मानवी कवटीत २२ अस्थी असतात. यांपैकी ८ अस्थींची करोटी वा मेंदूची पेटी बनते. करोटीच्या आत मेंदू असतो. उरलेल्या १४ अस्थींचा चेहरा तयार होतो. त्याला चर्या कंकाल म्हणतात. खालचा जबडा बराच सुटा असून त्याचा वरच्या जबड्याशी सांधा असल्यामुळे तो वर-खाली होऊ शकतो.

कवटीच्या हाडांना विशिष्ट ठिकाणी असलेल्या भोकातून कर्पर चेता बाहेर पडतात.कवटीमुळे मेंदूचे संरक्षण होते. डोक्याच्या संरचनेला आधार मिळतो. दिशा व अंतराच्या जाणिवेसाठी डोळ्यांची स्थिती, दोन कानांची स्थिती व त्यांतील अंतर योग्य राखले जाते. अन्न खाण्यासाठी व चावण्यासाठी जबड्यांच्या हालचालीला आणि दातांना भक्कम आधार मिळतो. काही सस्तन प्राण्यांत संरक्षणासाठी असलेल्या शिंगांना भक्कम आधार मिळतो. मेंदूंचा आकार, खाणे, चावणे, गिळण्याचा प्रकार, कान व डोळ्यांचा उपयोग करण्याची पद्धत, हालचालींची पद्धत अशा अनेक घटकांनुसार सस्तन प्राण्यांत कवटीची संरचना वेगवेगळी असते.[]

अग्रकोटराच्या मागेच मध्यकोटर असून ते मध्यभागी निमुळते व दोन्ही बाजूंस पसरट असते. या भागाच्या मध्य रेषेत पश्चास्थी, दोन्ही बाजूंस तळाशी शंखास्थी व तिचा पसरट भाग आणि बाजूच्या भागांत पार्श्वास्थी असतात.

मध्यकोटराच्या मागे पश्चकोटर असून ते बहुधा सर्व पश्चास्थीने बनलेले असते. त्याच्या मध्यभागी बृहत्‌ रंध्र असून त्यातून मेरूरज्जू (मज्जारज्जू) मेंदूपासून खाली कण्यात उतरतो. पश्चास्थीचा पुढचा भाग व जतुकास्थीचा मागचा भाग हे या बृहत्‌ रंध्राच्या पुढे एकमेकांस जोडलेले असतात. कवटीच्या तळाशी अनेक छिद्रे असून त्यांतून तंत्रिका, रक्तवाहिन्या मेंदूकडून व मेंदूकडे जातात.

कवटीचा वरचा व बाहेरचा भाग अंडाकृती असून त्याच्यावर तीन शिवणी दिसतात. पुढच्या बाजूस दक्षिणोत्तर शिवण असून तिच्यामुळे पार्श्वास्थी व कपालास्थीचा संधी झालेला असतो. ह्या शिवणीचा मध्य भाग जन्माच्या वेळी मऊ व बिलबिलीत असून त्यालाच टाळू असे म्हणतात. ह्या टाळूचा भाग पुढे अस्थिमय होऊन एक ते दीड वर्षामध्ये टणक होतो. मध्यरेषेत अशीच शिवण असून तिला मध्यसीवनी असे म्हणतात. या शिवणीमुळे दोन्ही बाजूंच्या पार्श्वास्थींचा संधी होतो. त्या शिवणीच्या मागे इंग्रजी Vच्या उलट आकाराची कोणात्मक शिवण असून तिला शिखासीवनी असे म्हणतात. या शिवणीमुळे दोन्ही पार्श्वास्थी व पश्चास्थी यांचा संधी झालेला असतो

संदर्भ यादी

संपादन
  1. ^ "Skull". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2019-08-04.
  2. ^ "कवटी — विकासपीडिया". mr.vikaspedia.in. 2019-09-10 रोजी पाहिले.
  3. ^ "कवटी". मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती. 2019-09-10 रोजी पाहिले.