कल्पना रंजनी किंवा कल्पना (५ ऑक्टोबर १९६५ - २५ जानेवारी २०१६), ही एक तमिळमल्याळी चित्रपटांतून कामे करणारी अभिनेत्री होती. कल्पनाने विविध दक्षिण भारतीय भाषांमधील ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले.[] तिला ६० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये थानिचल्ला न्यान (२०१२) मधील तिच्या अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता.[] कल्पनाने १९७० च्या दशकाच्या उत्तरार्धात बालकलाकार म्हणून तिच्या करिअरला सुरुवात केली. मुख्य अभिनेत्री बनण्याच्या उद्देशाने ती इंडस्ट्रीत आली असली तरी तिच्या कॉमिक भूमिकांसाठी ती प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरली.

कल्पना हैदराबादला कार्ती अभिनीत ओपिरी/ठोझा या चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेली होती. २५ जानेवारी २०१६ रोजी, ती तिच्या हॉटेलच्या खोलीत बेशुद्ध अवस्थेत आढळली आणि क्रू सदस्यांनी तिला ताबडतोब रुग्णालयात नेले, परंतु वाटेतच हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाला.[][] २६ जानेवारी २०१६ रोजी तिचा मृतदेह तिच्या मूळ गावी नेण्यात आला आणि त्याच दिवशी अंत्यसंस्कार करण्यात आले.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ "Top Malayalam actress Kalpana passes away in Hyderabad". 26 January 2016. 4 February 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 25 January 2016 रोजी पाहिले.
  2. ^ "13 National Film Awards for Malayalam movies". Daily News and Analysis. 18 March 2013. 21 March 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 25 January 2016 रोजी पाहिले.
  3. ^ "Malayalam actress Kalpana passes away in Hyderabad". 26 January 2016.
  4. ^ Krishnamoorthy, Suresh (26 January 2016). "Malayalam actor Kalpana passes away". The Hindu. 3 August 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 3 August 2016 रोजी पाहिले.
  5. ^ "Actor Kalpana to reach her final resting place in Kerala today". 26 January 2016.