कल्पना मोरपारिया ह्या एक भारतीय बँकर आहे. ती गेली तीन वर्षे आयसीआयसीआय बँक शी संलग्न होती. सध्या ती जेपी मॉर्गन इंडियाची मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. कल्पना अनेक प्रमुख भारतीय कंपन्यांच्या बोर्डवर स्वतंत्र संचालक म्हणून काम करते. कल्पना ने कायद्याची पदवी मुंबई विद्यापीठ मधून घेतली आहे, तसेच भारत सरकारच्या अनेक समित्यांवर काम केले आहे. फॉर्च्युन नियतकालिका ने आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवसाय करणाऱ्या ५० सर्वात शक्तिशाली महिलांचा यादीत स्थान दिले आहे.[]

कल्पना मोरपारिया
जन्म ३० मे १९४९ (वय ५९)
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
शिक्षण सोफिया कॉलेज
प्रसिद्ध कामे आयसीआयसीआय बँक

कल्पना हिचा जन्म ३० मे १९४९ रोजी लोहाना कुटुंबात झाला. तिचा वडिलांचे नाव भवनदास व आईचे नाव लक्ष्मीबेन तन्ना होते. तीन बहिणीपैकी कल्पना सर्वात लहान होती. ती लहान असताना तिचा वडिलांचा मृत्यू झाला. त्यानंतर तिने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले, आणि विज्ञान विषयाचा अभ्यास करण्यासाठी सोफिया कॉलेज मध्ये प्रवेश घेतला. १९७० मध्ये ती रसायनशास्त्रात बी.एससी पदवीधर झाली. नंतर तिने रसायनशास्त्राचा अभ्यासक्रमात पदवी घेतली.

कारकीर्द

संपादन

कल्पनाची मोठी बहीण पारूल ठक्कर हिने कायद्याचा अभ्यास केला होता, आणि ती सॉलिसिटर फर्म मध्ये काम करत होती. कल्पनाने तिचा बहिणीचे अनुसरण करण्याचा निर्णय घेतला, आणि १९७५ साली ती आयसीआयसीआयमध्ये कायदेशीर विभागात रुजू झाली. व्यवस्थापनाने तिला विविध जबाबदाऱ्या सोपवल्या. १९९५ मध्ये मॅनेजमेंटने अमेरिकेतील कॅपिटल मार्केटच्या अभ्यासासाठी तिला अमेरिकेला पाठवलं, जिथे त्यांनी तीन महिने न्यू यॉर्कच्या डेव्हिड पोल्क आणि वार्डवेलमध्ये काम केले.[]

व्यवसायातील प्रगती

संपादन

आईसीआयसीआय बँकेच्या जन्मासाठी त्यांनी १९९९ साली न्यू यॉर्क स्टॉक एक्स्चेंजमध्ये नोंदणी केली होती. आय.सी.आय.सी.आय. बँकेने २००२ मध्ये विलीनीकरण केली. कल्पनाने १९७५ ते १९९४ पर्यंत आयसीआयसीआयच्या कायदेशीर विभागात काम केले. १९९६ मध्ये त्यांना आयसीआयसीआयच्या बँकेच्या महाव्यवस्थापक म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यानंतर त्या कायदेशीर, नियोजन, कोषागार आणि कॉरपोरेट कम्युनिकेशन्स विभागात कार्यरत झाली. १९९८ मध्ये तिला आयसीआयसीआय बँकेचा वरिष्ठ महाव्यवस्थापक म्हणून नियुक्त केले गेले. मे २००१ मध्ये तिला आईसीआयसीआयच्या संचालक मंडळामध्ये सामील करण्यात आले. २००६ मध्ये पुन्हा त्यांना आयसीआयसीआय बँकेचा उपव्यवस्थापक म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यानंतर त्यांना संयुक्त व्यवस्थापकीय संचालक म्हणून घोषित करण्यात आले.आज त्या जे पी मॉर्गनचा मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "From doing-nothing ambition to an ambitious banker, meet Kalpana Morparia". dna (इंग्रजी भाषेत). 2016-03-28. 2018-07-28 रोजी पाहिले.
  2. ^ "When I Was 25: JP Morgan's CEO Kalpana Morparia looks back". dna (इंग्रजी भाषेत). 2015-08-09. 2018-07-28 रोजी पाहिले.