कल्पना चकमा ही स्थानिक रहिवाशांचे अधिकार आणि स्रियां यांच्या मुलभूत हक्कांसाठी लढणारी बांगलादेश[१] मधील कार्यकर्ती आहे. ती हिल महिला फेडरेशन या संस्थेची सचिव आहे. तिचे आणि तिच्या दोन भावांचे १२ जून १९९६ रोजी लल्यगाव मधील त्यांच्या घरातून बांगलादेश सैन्याने अपहरण केले. ती अजूनही बेपत्ता आहे.[२] तिच्या बेपत्ता होण्यामागे कोण आहे याचा तपास केला गेला नाही. [३] अपहरणानंतर तिचा मृत्यू झाला असे गृहीत धरले गेले आहे.[४]

पूर्व जीवन संपादन

कल्पना चकमा, यांची ओळख चित्तगोंग(Chittagong) या डोंगराळ भागातील मानवी हक्कांची कार्यकर्ती म्हणून होती. ती बांगलादेशामध्ये हिल महिला फेडरेशनची सचिव होती.[५] ती बांगलादेश सैन्याकडून बांगल्यादेशातील स्त्री आणि पुरुषांचा होणारा छळ आणि दडपशाहीवर टीका करत होती. त्यासाठी तिने तिच्या भागांमध्ये वेगवेगळ्या परिषदा, परिसंवाद आणि विविध सभा आयोजित केल्या.[६] ती स्वायत्ततेसाठीची चळवळ, तसेच पर्बत्य छत्तग्राम जन संहती समिती तसेच चित्तगोंग येथील रहिवाशांसाठीची निमलष्करी फुटीरवादी संघटना यासाठी मजबूत आधार होती. डिसेंबर २, ११९७ रोजी स्वाक्षरी केलेल्या शांतता करारापासून संघटनेने हत्यारे टाकून दिली आणि आता तो रहिवाशांसाठी एक राजकीय पक्ष म्हणून कार्यरत आहे. बांगलादेश सरकारला या संघटनेपासून बांगलादेशाच्या सार्वभौमत्वाला धोका वाटत होता.[७] १२ जून १९९६ रोजी झालेल्या सामान्य लोकसभा निवडणुकीत बिजय केतन चकमा या अपक्ष उमेदवाराच्या बाजूने ती सक्रीय होती. ते पहारी गण परिषदेचे वरिष्ठ सदस्य होते. सातव्या राष्ट्रीय निवडणुकांच्या काही तास आधी तिचे अपहरण करण्यात आले.[८]

अपहरण संपादन

निवडणूकीला केवळ ६ तास शिल्लक असताना १२ जून १९९६ रोजी रात्री १ वाजता बांगलादेश सैन्याकडून रंगमती या तिच्या गावातून कल्ल्पना चकमाचे अपहरण करण्यात आले.[९] सैन्यातील एक लेफ्टनंट फरदोस आणि ग्राम संरक्षण पक्षाचे दोन सदस्य, नुरुल हेक आणि सालेह अहमद, यांनी [१०] जवळच्या कोचोईछरी सैन्य बराकातून रात्री छापा टाकला आणि तिला जबरदस्तीने पकडले. तिच्या ६० वर्षे वयाच्या वृद्ध आई, बधुनी चकमा, यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले - त्यावेळी घरात कोण आहे ते पाहण्यासाठी बाहेरून कोणीतरी हाक मारली. तेव्हा आम्ही गाढ झोपेत होतो. मग त्यांनी घराची कडी बाहेरून तोडली आणि घरात आले. त्यांनी टॉर्चचा प्रखर प्रकाश आमच्या तोंडावर पाडला आणि माझा धाटका मुलगा खुदिरामला ते घेऊन गेले. ते म्हणाले की सरांना त्याच्याशी बोलायचे आहे. काही मिनिटातच माझा मोठा मुलगा कालिचरण आणि मुलगी कल्पना हिलाही ते घेऊन गेले. मागे मी आणि कालिचरणची बायको एवढ्याच राहिलो.

कालिचरण चकमा, एक शेतकरी आणि घरातला कमावता सदस्य यांनी म्हटले आहे की तिघाना डोळे आणि हात बांधून घराजवळच्या विहिरापाशी खाली बसायला सांगितले होते. - त्यातल्या काहींनी सैन्याचे करडे कपडे घातले होते आणि काहींनी लुंगी घालून कमरेला गुंडाळली होती. त्यांनी आधी खुदिरामला नेले. ते बंगाली बोलत होते.

कल्पना चकमाचा शोध संपादन

सम्राट सूर चकमा यांच्या मदतीने खुदिरामने कोजोईछारी येथील सैन्य शिबिराशी कल्पनाविषयी चौकशी करण्यासाठी संपर्क केला. छावणीत त्याला शांती बाहिनीचा असे म्हणून धमकवण्यात आले. कालिचरण स्थानिक बाघैछरी पोलीस ठाण्यात प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदणी करण्यासाठी गेला. पण पोलीस स्टेशन किंवा आर्मी कॅम्प येथील कोणीही कल्पनाची सुटका करण्यासाठी कार्यवाही केली नाही.[११]

सरकारची भूमिका संपादन

विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या टीकेमुळे रंगमतीचे पोलीस अधीक्षक कल्पनाच्या घरी गेले. त्यांना १८० बांग्लादेशी सैन्याच्या बराकीमुळे कल्पनाचा शोध घेणे त्यांना शक्य झाले नाही. १४ जुलै १९९६ रोजी अनेक महिलांच्या संस्थांनी संयुक्तपणे गृहमंत्रालयाकडे मेमो सादर केला. त्यांनी गृहमंत्रालयाच्या आखत्यारीत त्या भागातील कायदा आणि सुव्यवस्था येत नसल्यामुळे पंतप्रधानांना भेटण्याचा सल्ला दिला. पोलिसांनी तपासामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे म्हणणे ऐकून घेतले गेले आणि मुख्य आरोपीला प्रश्न विचारलेच गेले नाहीत .[१२]

बांगलादेश सैन्याची भूमिका संपादन

१८ जुलै १९९६, रोजी बांगलादेश सैन्याने कल्पना चकमा हिची माहिती देणाऱ्यास ५०,००० टकांचे बक्षीस जाहीर करणारी पत्रके हेलिकॉप्टर मधून टाकली. डोंगराळ निगराणी मानवी हक्क मंचांने (HWHRF), बांगलादेश सैन्य अधिकारी यांनी मुद्दाम सत्य लपवल्याचा दोषारोप केला. बांगलादेश सैन्याने तो आरोप नाकारला आणि म्हटले की, लेफ्टनंट फरदोस किंवा सैन्याचा कोणत्याही इतर सदस्य अपहरणात सहभाग नव्हता. बांगलादेश सैन्याने संपूर्ण घटना "प्रेम प्रकरण" आहे असे म्हटले. सैन्याने पुन्हा त्यांची भूमिका बदलली आणि वर २३ जुलै १९९६ एक विधान जाहीर केले, "कल्पना चकमा हिच्याकडे पासपोर्ट होता आणि ती गुप्तपणे परदेशात गेली ". पण सैन्याचे हे विधानकार्यकर्त्यांनी फेटाळले कारण कल्पनाकडे पासपोर्ट नव्हता. महिलांच्या गटांनी असा दावा केला आहे की कल्पनाचे अपरहण करणारे आरोपी अजून कार्यरत आहेत.[१३]

संदर्भ संपादन

 1. ^ Pankhurst, edited by Donna (2007). Gendered peace : women's search for post-war justice and reconciliation. London: Routledge. p. 198. ISBN 041595648X.CS1 maint: extra text: authors list (link)
 2. ^ Ahmed, Hana Shams. "The business of 'othering' and 'othering' as business". thedailystar.net. २१ नोव्हेंबर २०१८ रोजी पाहिले.
 3. ^ Star Online Report. "Culture impunity encouraging crimes". thedailystar.net. २१ नोव्हेंबर २०१८ रोजी पाहिले.
 4. ^ Chakma, Shantimoy; Preetha, Sushmita S. "KALPANA KIDNAP : CID probe vexes all". thedailystar.net. Archived from the original on 2016-03-04. २१ नोव्हेंबर २०१८ रोजी पाहिले. line feed character in |title= at position 17 (सहाय्य)
 5. ^ Parker, Lydia. http://www.huffingtonpost.co.uk/lydia-parker/kalpana-chakma-bangladesh_b_4464852.html. Missing or empty |title= (सहाय्य)
 6. ^ http://www.dhakatribune.com/juris/2014/feb/14/searching-17-years. Missing or empty |title= (सहाय्य)
 7. ^ Chowdhury, Elora Halim (2011). Transnationalism reversed women organizing against gendered violence in Bangladesh. Albany: State University of New York Press. p. 175. ISBN 1438437536.
 8. ^ Sathi, Muktasree Chakma. http://www.dhakatribune.com/law-amp-rights/2013/jun/12/kalpana-abduction-government-backing-perpetrators-%E2%80%93-civil-society. Missing or empty |title= (सहाय्य)
 9. ^ Ramakrishnan, Nitya. In Custody: Law, Impunity and Prisoner Abuse in South Asia. SAGE Publications India. p. 236. ISBN 9788132116325. 2 January 2016 रोजी पाहिले.
 10. ^ Tribune Report. http://www.dhakatribune.com/bangladesh/2015/jun/13/arrest-kalpana-chakmas-abductors-demanded. Missing or empty |title= (सहाय्य)
 11. ^ Watch, Human Rights (2009). Ignoring executions and torture : impunity for Bangladesh's security forces. New York, NY: Human Rights Watch. p. 25. ISBN 1564324834.
 12. ^ Preetha, Sushmita S. http://www.thedailystar.net/op-ed/politics/the-kalpana-chakma-i-know-and-the-one-i-never-will-95593. Missing or empty |title= (सहाय्य)
 13. ^ Staff Correspondent. http://www.thedailystar.net/city/women-repression-go-due-impunity-96364. Missing or empty |title= (सहाय्य)

बाह्य दुवे संपादन