कर्ट डाल्टन (१ जानेवारी १९७४ बेव्हरली, मॅसॅच्युसेट्स, अमेरिका) एक अमेरिकन वृत्तपत्रकार आणि कॅनाबिस डॉट नेट चे संस्थापक आहेत जे मीडिया न्यूझ चॅनेल आहे. २००१ मध्ये ३० वर्षाखालील टॉप ३० संस्थापकांना टेली पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.[१][२]

शिक्षण आणि करिअर संपादन

डाल्टनचा जन्म मॅसॅच्युसेट्समध्ये झाला आणि वाढला. त्यांनी शिकागो विद्यापीठातून १९९६ मध्ये शिक्षण पूर्ण केले. १९९८ मध्ये त्यांनी पत्रकार म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली आणि जीबी  न्यूझ चॅनलमध्ये काम केले. २००१ ते २००५ या काळात त्यांनी अराइस न्युज या दूरचित्रवाणी वाहिनीमध्ये क्रीडा बातम्यांच्या श्रेणीत काम केले. २००७ मध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट पत्रकारितेसाठी नेशन बझ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २०१२ मध्ये तो "द न्यूझरूम" नावाच्या अमेरिकन राजकीय नाटक टेलिव्हिजन मालिकेत दिसला.[३]

२०१६ मध्ये त्यांनी कॅनाबिस डॉट नेटची स्थापना केली जी कायदेशीर गांजा उद्योगासाठी जागतिक सोशल नेटवर्किंग साइट आहे. कॅनाबिस डॉट नेट ला २०२० मध्ये सर्वोत्कृष्ट कंपनीसाठी इंटरनेट जाहिरात स्पर्धा (आईएसी) पुरस्कार देण्यात आला.[४]

बाह्य दुवे संपादन

कर्ट डाल्टन प्रोफाइल

संदर्भ संपादन

  1. ^ "7 of Curt Dalton Podcasts Interviews | Updated Daily - OwlTail". www.owltail.com. Archived from the original on 2022-10-05. 2022-09-30 रोजी पाहिले.
  2. ^ "Dalton, Curt". Dalton, Curt. 2022-09-30 रोजी पाहिले.
  3. ^ Redactie, Door (2022-07-02). "Navigating the Course of the Legal Cannabis World with Cannabis.net". Mashable Benelux (डच भाषेत). 2022-09-30 रोजी पाहिले.
  4. ^ "Curt Dalton of Cannabis.net on Why High-Traffic Cannabis-Related Websites Are the Most Undervalued Asset in the Industry". Grazia USA (इंग्रजी भाषेत). 2021-08-15. 2022-09-30 रोजी पाहिले.