करुण नायर

भारतीय क्रिकेटपटू
(करूण नायर या पानावरून पुनर्निर्देशित)

करुण कलाधरन नायर (मल्याळम : കരുൺ നായർ) (जन्म ६ डिसेंबर १९९१) हा केरळचा कर्नाटककडून खेळणारा भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. तो उजव्या हाताने फलंदाजी करणारा फलंदाज आणि ऑफ ब्रेक गोलंदाज आहे. तो २०१३ भारतीय प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचा एक सदस्य होता. २०१४ च्या आयपीएल मोसमात राजस्थान रॉयल्सने त्याला विकत घेतले तर २०१६ च्या मोसमात ४ कोटी रुपयांची बोली लावून दिल्ली डेरडेव्हिल्सने त्याला संघात सामावून घेतले.

करुण नायर

तो दिल्ली डेरडेव्हिल्स, भारत अ, भारत १९ वर्षांखालील संघ, कर्नाटक, कर्नाटक राज्य क्रिकेट असोससिएशन कोल्टस् XI, कर्नाटक राज्य क्रिकेट असोससिएशन XI, कर्नाटक १५-वर्षांखालील, कर्नाटक १९-वर्षांखालील, मंगलोर युनायटेड, राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, दक्षिण विभाग ह्या संघांकडून खेळला आहे.

त्याने त्याचे एकदिवसीय पदार्पण झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेमध्ये ११ जून २०१६ रोजी हरारे स्पोर्ट्स क्लब मैदानावर केले.[] ह्या सामन्यात डावाची सुरुवात करताना तो अवघ्या ७ धावा करून बाद झाला परंतु दुसऱ्या सामन्यात नेटाने फलंदाजी करताना त्याने ३९ धावा केल्या.

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "भारताचा झिम्बाब्वे दौरा, १ला एकदिवसीय सामना: झिम्बाब्वे वि. भारत, रारे, जून ११, २०१६". एसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ११ जून २०१६ रोजी पाहिले.