कमला चौधरी (२२ फेब्रुवारी १९०८-१९७०) या हिंदी भाषेतील लघुकथा लेखिका होत्या आणि तिसऱ्या लोकसभेतील हापूरमधून खासदार होत्या. भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करणाऱ्या संविधान सभेचा भाग असलेल्या १५ महिलांमध्ये त्या एक होत्या.[][][]

कमला चौधरी
जन्म कमला चौधरी
२२ फेब्रुवारी १९०८
लखनौ, ब्रिटिश भारत
मृत्यू १९७०
लखनौ, उत्तर प्रदेश, भारत
निवासस्थान लखनौ
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा
  • राजकारणी
ख्याती भारतीय संविधान सभेतील महिला सदस्य
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

कमला चौधरी यांचा जन्म 22 फेब्रुवारी 1908 रोजी लखनऊमध्ये झाला. त्यांचे वडील राय मनमोहन दयाल हे उपजिल्हाधिकारी होते. तर आजोबा 1857च्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धात लखनौ येथे स्वतंत्र अवध सैन्याचे कमांडर होते.[]

त्यांनी फेब्रुवारी १९२२ मध्ये जे.एम. चौधरी यांच्याशी विवाह केला. त्यांचे सासरे स्वराज्य पक्षाच्या संस्थापकांपैकी एक होते. त्यांना लेखक आणि लेखिका डॉ. इरा सक्सेना तसेच कै. माधवेंद्र मोहन आणि डॉ. हेमेंद्र मोहन चौधरी यांच्यासह अनेक मुले होती.[]

कारकीर्द

संपादन

१९३० च्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीदरम्यान चौधरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाल्या. तेव्हापासून त्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सक्रियपणे सहभागी होत्या. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना अनेक वेळा तुरुंगात टाकले होते.[] अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या ५४ व्या अधिवेशनात त्यांनी वरिष्ठ उपाध्यक्षा म्हणून काम केले. त्या भारताच्या संविधान सभेच्या निवडून आलेल्या सदस्य होत्या आणि संविधान स्वीकारल्यानंतर त्यांनी १९५२ पर्यंत भारताच्या प्रांतीय सरकारच्या सदस्या म्हणून काम केले.[][] त्या उत्तर प्रदेश राज्य समाज कल्याण सल्लागार मंडळाच्या सदस्या होत्या.[][][१०]

१९६२ मध्ये, चौधरी या काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार म्हणून 1962ची भारतीय सार्वत्रिक निवडणूक हापूरमधून जिंकून तिसऱ्या लोकसभेच्या सदस्या झाल्या. त्यांनी त्यांच्या जवळच्या प्रतिस्पर्ध्याचा 28,633 मतांच्या फरकाने पराभव केला.त्यांचे चार कथासंग्रह; उन्माद (1934), पिकनिक (1936), यात्रा (1947) आणि बेल पत्र प्रकाशित झाले. लैंगिक भेदभाव, शेतकऱ्यांचे शोषण आणि विधवांची गरीब स्थिती हे त्यांचे मुख्य विषय होते.[११][१२]

संदर्भ

संपादन
  1. ^ a b "नारी शक्ति: कमला चौधरी स्वतंत्रता संग्राम के दौरान कई बार जेल गईं". Hindustan (हिंदी भाषेत). 2022-03-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-03-24 रोजी पाहिले.
  2. ^ "भारतीय राज्यघटना स्त्री कर्तृत्वाचा मागोवा". Loksatta. 2022-03-24 रोजी पाहिले.
  3. ^ "15 women who contributed in making the Indian Constitution". India Today (इंग्रजी भाषेत). 2022-03-24 रोजी पाहिले.
  4. ^ "GK Facts: जानें उन 15 महिलाओं को, जिन्‍होंने भारतीय संविधान के निर्माण में निभाई अहम भूमिका". Navbharat Times (हिंदी भाषेत). 2022-03-24 रोजी पाहिले.
  5. ^ "Constitution Day: संविधान सभा में शामिल थीं मेरठ की कमला चौधरी, स्वतंत्रता संग्राम सेनानी, साहित्यकार की आज भी जुडीं हैं यादें". Dainik Jagran (हिंदी भाषेत). 2022-03-24 रोजी पाहिले.
  6. ^ "संविधान निर्माण में इन 15 महिलाओं का रहा है भगीरथ योगदान, आइए जानें..." ETV Bharat News. 2022-03-24 रोजी पाहिले.
  7. ^ "On Republic Day, Priyanka Chopra hails the women who helped draft Indian Constitution". www.dnaindia.com. 2022-03-24 रोजी पाहिले.
  8. ^ Srivastava, Yoshita; Srivastava, Yoshita (2018-01-25). "These Are The 15 Women Who Helped Draft The Indian Constitution". Feminism In India (इंग्रजी भाषेत). 2022-03-24 रोजी पाहिले.
  9. ^ "Priyanka celebrates the women who helped draft the Indian Constitution on Republic Day". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2021-01-26. 2022-03-24 रोजी पाहिले.
  10. ^ "Constitution of India". www.constitutionofindia.net. 2022-08-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-03-24 रोजी पाहिले.
  11. ^ "26 January these 15 women also had an important role in Indian Constitution making mpap| संविधान निर्माण में इन 15 महिलाओं की भी थी अहम भूमिका, कोई राजकुमारी तो किसी ने विदेश से की थी पढ़ाई". zeenews.india.com. 2022-03-24 रोजी पाहिले.
  12. ^ "भारतीय संविधान को बनाने में इन 15 महिलाओं ने दिया था अहम योगदान". TV9 Bharatvarsh (हिंदी भाषेत). 2021-01-17. 2022-03-24 रोजी पाहिले.