कन्नड (औरंगाबाद)
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
कन्नड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक गाव आहे. हे गाव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या कन्नड तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. कन्नड तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा एक तालुका आहे. कन्नड या गावी या तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. कन्नड पासून पितळखोरा लेण्या केवळ २० किमी अंतरावर आहेत. वेरूळ लेण्या २८ की.मी तर अजिंठ्याच्या लेण्या १०० किमी अंतर वर आहेत. प्रसिद्ध गौताळा अभयारण्य पाच की.मी अंतरारून सुरू होते. कै आमदार नारायणराव पाटील नागदकर यांनी तालुक्याचा विकास चांगल्या प्रकारे केलेला आहे. महाविद्यालयाची स्थापना, मार्केट कमिटीला जागा, एसटी थांब्याची जागा, या साठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. तालुक्यातील लागवड क्षेत्र १०५६६०.२३ , खरीप गावे-१५६,रब्बी गावे ५६. खरीप क्षेत्र-८६०००, रब्बी क्षेत्र- १९६६०.२३. तालुक्यातील प्रमुख नद्या-शिवना, ब्राह्मनि, अंजना, पूर्णा. मध्यम प्रकल्प- अंबाडी ( आताचे नाव. कै.नारायणराव गीरामाजी पाटील प्रकल्प), गडदगड,.तालुक्यातील ओळीत खातेदारांची संख्या- ६२६७७. कन्नड शहराची लोकसंख्या-३४४०३. तालुक्यातील ग्रामीण भागाची लोकसंख्या- ३५६८६४. तालुक्यातील शासकीय आश्रम शाळा तीन- ब्राम्हणी, वडनेर आणि नागद. स्वस्त द्यान्य दुकाने २०६ +३०. प्राथमिक शाळा २२८, केंद्रीय प्राथमिक २१,माध्यमिक जी.प. -६, खाजगी - ६१, ऐतिहासिक स्थळे- पितळखोरा लेण्या, किले अंतुर, सितान्हान्ही, 'उंच डोंगर"- सुरपाळा. अभयारण्य- गौताळा अभयारण्य. शहरातील महाविध्यालाये दोन+ अध्यापक वि.२+अपंग अध्या.१ अभ्यासक- गणिततज्ञ भास्कराचार्य, ज्योतिषचार्य व कवी दादागुरू जोशी , अहिराणीचे अभ्यासक डॉ. रमेश सूर्यवंशी यांचे या शहरात वास्तव्य. स्वातंत्र चळवळचे मिश्रीलाल पहाडे, सहकार चळवळचे रामचंद्र पाटील, क्रांतीच्या चळवळचे काकासाहेब देशमुख, ग्रामसुधारणेचे रामराव अन्ना बहिरगावकर, तालुक्याचा विकास महर्षी अप्पासाहेब नारायण गीरामाजी पाटील नागदकर यांचे वास्तव्य येथलेच. कला, वाणिज्य विज्ञान शिक्षण देणारी येथे दोन महाविद्यालये आहेत.
तालुक्यातील शेतक-यांनी हमखास उत्पन्न देणारे पीक म्हणून अद्रकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली. यावर्षी महाराष्ट्रात अद्रकाची जास्त लागवड झाली. प्रचंड प्रमाणात उत्पादित सर्व अद्रकाची खरेदी होईल एवढी मोठी एकही बाजारपेठ महाराष्ट्रात नाही. त्यामुळे अद्रकाचे भाव गडगडले; परंतु परराज्यात बाजारपेठ उपलब्ध झाल्याने शेतक-यांची होणारी हानी टळली. सध्या कन्नड तालुक्यातून सुरत, इंदूर, भोपाळ, झाशी, दिल्ली येथील बाजारपेठांमध्ये अद्रक विक्रीसाठी जात आहे.
गेल्या दहा वर्षांपासून कन्नड तालुक्यातील शेतकरी आद्रकाचे उत्पादन घेण्यात आघाडीवर आहे. २००६ हे वर्ष सोडले तर इतर वर्षांमध्ये आद्रकला चांगली मागणी होती. हमखास उत्पन्न देणारे पीक म्हणून तालुक्यात आद्रकाची लागवड करण्याचे प्रमाण वाढले.
कन्नड तालुका आद्रक बेणे विक्रीचे माहेरघर बनले. गेल्या पाच वर्षांत येथून मोठ्या प्रमाणात बेणे विक्री झाले. जास्त उत्पादन घेण्यात कन्नड तालुक्याने आद्रकासाठी प्रसिद्ध असलेल्या सातारा व छत्तीसगडलाही मागे टाकले. यावर्षी राज्यात व राज्याबाहेरही आद्रकची जास्त लागवड झाली.२००८ला आद्रकला प्रतिक्विंटल ४ हजार रुपये भाव होता, तर यावर्षी प्रतिक्विंटल ८०० ते १००० रुपये भाव मिळत आहे. प्रचंड उत्पादित सर्व आद्रकाची खरेदी होईल, अशी एकही बाजारपेठ महाराष्ट्रात नाही; परंतु आद्रकास परराज्यात बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. त्यामुळे शेतक-यांचे नुकसान टळले. सध्या कन्नड तालुक्यातील आद्रक सूरत, इंदोर, भोपाळ, झाशी, दिल्ली येथील बाजारपेठेत जात आहे. मजुरी, खते, कीटकनाशके यांच्या किमती वाढल्या, ठिबक सिंचन आदी कारणांमुळे आद्रकचे उत्पादन घेण्यास शेतक-यांना जास्त खर्च लागला. त्यात आद्रकला येथे कमी भाव आहे; परंतु परराज्यातील बाजापेठांमुळे किमान खर्च भागून शेतक-यांच्या शिखात दोन पैसे येत असल्याने शेतकरी समाधानी आहे.
गावे: शिवराई: हे 1 कन्नड़ तालुक्यातील महत्त्वाचे गांव असून येथे अदरक व् कापूस सशेतीसाठी प्रसिद्ध आहे या गावमधे छत्रपति शिवाजी महाराजांचे 1 भव्य स्मारक बनवले आहे. हिराजि बाबा यांचे मंदिर आहे. भगवान बजरंग बलीचे 1 भव्य ऐसे मन्दिरहि आहे. गावत अनेक जतींचे लोक आनंदाने राहतात.
जळगाव (घाट): हे शिवना टाकळी मध्यम प्रकल्पा जवळीलच एक छोटेसे खेडे आहे.. या ठिकाणी प.पू. प्रभूनाथ महाराज यांची संजीवन समाधी आहे. दर वर्षी त्यांच्या पुण्यतिथी निमित्त मोठा हरिनाम सप्ताह केला जातो.
विशेष
संपादनपितळखोरा लेणी तसेच प्रसिद्ध गौताळा अभयारण्य हे या तालुक्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.
महाविद्यालये
संपादन- छत्रपती शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कन्नड
- डॉ. भीमराव आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय, कन्नड
- कै. रामराव पाटील बहिरगावकर एम. सी.व्ही.सी. महाविद्यालय, कन्नड
- विनायकराव पाटील, महाविद्यालय, कन्नड
- IETK Diploma In Engineering Colleges, Kannad
- श्री. आसारामजी भांडवलदार कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय
कै. बाळासाहेब पवार यांनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन कन्नड सहकारी साखर कारखाना सुरू केला.