कथासरित्सागर
भारतीय दंतकथा, परीकथा आणि लोककथांचा ११व्या शतकातील संस्कृत संग्रह
(कथासरित्सागर (पाच भागांत) या पानावरून पुनर्निर्देशित)
कथासरित्सागर हा संस्कृत भाषेतील प्राचीन भारतीय कथाग्रंथ आहे. सोमदेव नावाचा काश्मिरी शैव ब्राह्मण याचा लेखक होता. हा ग्रंथ गुणाढ्याच्या पैशाची भाषेतील बॄहत्कथा या ग्रंथांतील कथांवर आधारलेला किंवा अनुवादलेला असावा असे मानले जाते. मात्र मूळ बृहत्कथा ग्रंथाची संहिता उपलब्ध नाही; केवळ सोमदेवाने अनुवादलेली संस्कृत भाषेतील कथासरित्सागराची श्लोकबद्ध संहिताच उपलब्ध आहे.[१]
लेखक सोमदेवाबद्दल फारशी कुठेही माहिती आढळत नाही; त्याच्या वडिलांचे नाव रामदेवभट्ट होते, एवढाच काय तो संदर्भ उपलब्ध आहे. काश्मिराचा राजा अनंतदेव (शासनकाळ : इ.स. १०६३ - इ.स. १०८१) याची पत्नी राणी सूर्यमती हिच्या मनोरंजनासाठी कथासरित्सागर रचण्यात आला.
संदर्भ
संपादन- ^ नेमाडे, भालचंद्र. टीकास्वयंवर. p. ३०५.