पैशाची भाषा

प्राचीन भारतातील नामशेष भाषा

पैशाची ही प्राचीन भारतात बोलली जाणारी प्राकृत भाषा असून ती सध्या मृत भाषा गणली जाते.

ही पिशाच्चांची भाषा असल्याची आख्यायिका वाचायला मिळते तरी यात फारसे तथ्य नसून बहुधा ही भाषा आदिवासी व राना-वनातील जमातींची बोली भाषा असावी असा तज्ज्ञांचा कयास आहे.

गुणाढ्याचा बृहत् कथा हा ग्रंथ पैशाची भाषेत लिहिलेला होता.