कजगाव हे जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील सगळ्यात मोठे गाव असून हे ठिकाण केळीच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. तसेच ह्या गावात मोठा आठवडे बाजार भरत असून जवळपास 35-40 खेडे कजगाव सोबत अनेक कारणांनी जोडले गेले आहेत. याठिकाणी रेल्वे प्रवासासाठी इगतपुरी व नाशिक पर्यंत दोन दुय्यम एक्स्प्रेस तसेच पुणे पर्यंत जाण्यासाठी एक एक्सप्रेस असे थांबे दिलेले आहेत. परिसरातून अजून महाराष्ट्र तसेच काशी एक्सप्रेस ला थांबा मिळवण्याची मांगणी येथून वारंवार करण्यात येते. जेणेकरून येथील लोकांना जिल्ह्याच्या ठिकाणी रोजगार उपलब्ध होईल.