कच्चे लिंबू म्हणजे, अनुभव अथवा परिपक्वतेअभावी खेळात सामावून घेतलेला व साधारणतः वयाने छोटा गडी अथवा सवंगडी.हा शब्द भारतीय खेळात सहसा वापरण्यात येतो. घरघुती बैठ्या खेळात जसे पत्ते, कॅरम अथवा लगोरी, लपंडाव, लंगडी या प्रकारच्या मैदानी खेळात धाकट्या भावंडाने अथवा कमी वयाचे मुलाने/मुलीने खेळण्याचा हट्ट धरला असता व तो/ती आकांत-तांडव करीत असता, त्यास खेळात सामावून घेतांना, हा शब्द वापरतात.

या अशा कच्च्या लिंबास खेळाचे सर्वसाधारण नियम लागू होत नाहीत व त्याने अनेक चुका केल्या तरी चालतात. अनेकदा,त्यास समजावण्यासाठी, तो बळे-बळेच 'जिंकला' असे घोषित करण्यात येते.बहुदा, अशा प्रकारचा डाव लवकरच गुंडाळण्यात येतो.