कंबर दुखी

(कंबरदुखी या पानावरून पुनर्निर्देशित)


शहरी लोकांच्या रोजच्या अति शीघ्र जीवनशैलीमुळे त्यामना व्यायाम करण्यास वेळ मिळत नाही. रोजची दगदग, धावपळ, उठबस म्हंणजे व्यायाम नव्हे. व्यायाम न करण्याचे परिणाम म्हणजे चुकीच्या जीवनशैलीमुळे पाठदुखी, कंबरदुखी आणि मणक्यांचे आजार हे केवळ वाढत्या वयातच होणारे आजार न राहता ते तरुण आणि अगदी लहान वयातही होणे.

मणक्यांमध्ये नैसगिकत: चार वेगवेगळे बाक असतात. मानेला पुढच्या दिशेने (सर्व्हायकल स्पाईन), पाठीला मागच्या दिशेने (थोरॅसिक स्पाईन), कंबरेला पुढच्या दिशेने आणि माकडहाडाला मागच्या दिशेने बाकाला लंबर असे म्हणतात. मणक्यांच्या मधून मज्जारज्जू जात करत असल्याने मणक्यांना इजा झाल्यास मज्जारज्जूवर परिणाम होऊन 'कंबरदुखी/पाठीचे दुखणे/मणक्याचे आजार सुरू होतात .

मणक्याचा आजार होण्याची कारणे

संपादन
  • लहान वयात खूप जास्त वजनदार दप्तराचे पाठीवर घेतलेले ओझे,
  • खुर्चीत जास्तीत जास्त वेळ बसणे, किंवा बसण्याची मुद्रास्थिती चुकीची असणे,
  • संगणकावर सतत काम करणे,
  • कोणत्याही वाहनातून प्रवास करताना खाच-खळगे, खड्ड्यांमुळे मणक्याला मार बसणे,
  • नेहमी पोट साफ न होणे,
  • रात्री जागरण होणे,
  • चिंता, शोक, क्रोध,
  • व्यायमाचा अभाव,
  • स्त्रियांमध्ये पाळी बंद झाल्यानंतर हाडांना येणारा ठिसूळपणा, इ.मुळे पाठीचा मणका गॅप किंवा कंबरदुखी उद्भवते.

मणक्याच्या आजारांची लक्षणे

संपादन
  • अस्थिक्षय किंवा कॅल्शियमच्या कमतरतेमुळे पाठीचा मणका कमजोर होणे,
  • हाता-पायामध्ये मुंग्या येणे, कंप येणे,अवयव बधीर होणे, त्यांच्यात कळा येणे,
  • कंबरेत दुखणे,सकाळी उठताना त्रास होणे,
  • कुशीवर वळताना त्रास होणे,किंवा पाठीच्या मणक्यातून कूस बदलताना कड कड आवाज येणे,कूस बदलताना पाठीचा मणका एकदम अवघडल्यासारखं होणे,
  • चालताना त्रास होणे किंवा चालता न येणे, कंबरेच्या मागील बाजूने पायाच्या तळव्यापर्यत्न शीर दुखणे,मांडी घालून खूप वेळ बसू न शकणे,पायाच्या पंजाची ताकद कमी होणे, पायातील स्पर्शज्ञान कमी होणे,
  • शौचाला बसता न येणे,चक्कर येणे,नसांवरील असह्य़ दबावामुळे लघवीचे नियंत्रण जाणे, असे काही भयप्रद परिणामही प्रसंगी दिसून येऊ शकतात.

मणक्याचे आजार झाल्यास पाळावयाचे पथ्य

संपादन
  • वांगे, बटाटा, हरबऱ्याची डाळ, वाटाणे, चवळी, वाल, अतितिखट पदार्थ कटाक्षाने टाळावेत.
  • अति परिश्रमाची कामे टाळावीत, जड वजनाच्या वस्तू उचलू नये.
  • जास्त मोटारसायकल प्रवास टाळावा.
  • आंबट पदार्थ, दही, चिंच व आम्ल रसाचे आंबवून केलेले पदार्थ उदा. इडली, ढोकळा, पाव, डोसा बंद करावे.

काळजी

संपादन
  • पाठीच्या मणक्यावर पेनकिलर आणि व्हिटॅमिन डीच्या गोळ्या हा काही यावरील इलाज नव्हे हे वेळीच लक्षात घ्या.
  • वेडेवाकडे बसणे निक्षून टाळावे.
  • सतत संगणकासमोर बसून करायचे काम असल्यास, दर पाऊण ते एक तासाने ब्रेक घेऊन चक्क आळस दिल्याप्रमाणे हात वरच्या दिशेने ताणून स्नायू मोकळे करावेत.
  • मऊ गादीचा त्याग करून कडक पण उबदार बिछान्यावर झोपणे सुरू करावे.
  • खुर्चीत वगैरे बसताना आपली कंबर त्या खुर्ची वा सोफ्याच्या पाठीला टेकते आहेना याकडे विशेष लक्ष द्यावे. नसल्यास पाठीमागे एखादी पातळ उशी घेऊन बसण्यास सुरुवात करावी.
  • रोज तिळाचे तेल कोमट करून पाठीच्या कण्याला वरून खालच्या दिशेने लावावे आणि सुमारे दहा मिनिटांनी गरम पाण्याने अंघोळ करावी.
  • सकाळी उठल्याजागीच पाठीवर आडवे पडून एका वेळेस एक पाय वर उचलणे व संथ गतीने खाली आणणे असे सोपे व्यायाम प्रथम करावेत.
  • दोन्ही पाय उचलण्याचे प्रयत्न करावेत.(सर्वांगासन,शलभासन व हलासन)
  • आपले दोन्ही पाय सायकलिंग केल्याप्रमाणे हलवावेत. किंवा एक एक करून दोन्ही पायांनी हवेत सावकाश 0 हा आकडा रेखाटावा.
  • पोटावर झोपून मान व खांदे वर उचलून भुजंगासन करावे.
  • दोन्ही हात सरळ पुढे व पाय मागे असे वर उचलून शरीर होडीच्या आकाराचे करून नौकासन करावे.
  • जमत असेल तर पोटावर झोपून दोन्ही पाय हातात पकडून धनुरासन करावे.
  • कार्यालयीन काम करताना साध्या लाकडाच्या खुर्चीवर एक साधारण उशी ठेवून पाय व कंबर आक्रसून न ठेवता मोकळी ठेवावी म्हणजेच एकदम कुबड काढून व एकदम ताठ बसणेही चुकीचे आहे.
  • आपल्या आयुर्वेदीय वैद्यांच्या सल्ल्याने बस्ती, कटीबस्ती, षष्टिशाली पिण्डस्वेद, तैलधारा इत्यादी करावे.
  • झोपावे कसे : पूर्ण सरळ वा पालथे झोपण्यापेक्षा छोटी उशी घेऊन, गुडघे थोडे दुमडून एका कुशीवर निजणे हे मणक्यांसाठी सर्वात आरामदायी आहे.
  • लाकडाच्या किंवा लोखंडाच्या कडक पलंगावर कापसाची गादी टाकून झोपावे. (मात्र, खाट, बाज या प्रकारच्या पलंगावर नाही.)
  • वाहनाची नियमित तपासणी करावी.
  • आहारात डिंक, खजूर, उडीद, दूध, तूप यांचा समावेश करावा.
  • वातूळ असलेले पदार्थ खाणे टाळावे.
  • पाठीला आराम देणारी योगासने नियमितपणे करण्यास सुरुवात करावी.
  • योगासने करण्यास जमत नसतील तर हे सोपे व्यायाम प्रकार करावेत.