ओम प्रकाश पुरी (जन्म : अंबाला, १८ ऑक्टोबर १९५०; - मुंबई, ६ जानेवारी २०१७) हे एक भारतीय अभिनेते होते. त्यांनी अनेक हिंदी तसेच ब्रिटिश, अमेरिकन, पाकिस्तानी चित्रपटांमध्ये काम केले. त्यांना १९९० साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.[१] ओम पुरी यांच्या कारकिर्दीची सुरुवात १९७६ साली घाशीराम कोतवाल या मराठी चित्रपटाने झाली. अर्ध सत्य (१९८२) या चित्रपटामध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेसठी त्यांना सर्वोत्तम अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्याचबरोबर त्यांना आणखी एक राष्ट्रीय पुरस्कार, दोन फिल्मफेर पुरस्कार, एक जीवन गौरव पुरस्कार मिळाले आहेत. ओम पुरी यांनी सुमारे ३०० चित्रपटांत भूमिका केल्या आहेत.

ओम पुरी
जन्म ओम पुरी
१८ ऑक्टोबर १९५० (1950-10-18)
अंबाला, हरियाणा, भारत.
मृत्यू ६ जानेवारी, २०१७ (वय ६६)
मुंबई.
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनेता
शिक्षण भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्था
राष्ट्रीय नाट्य विद्यालय
पुरस्कार पद्मश्री
पत्नी सीमा कपूर (१९९१)
नंदिता पुरी (१९९३-२०१३)
अपत्ये ईशान पुरी.

पुरी यांचा अंधेरी मुंबई येथे राहत्या घरी वयाच्या ६६व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.[२]

संदर्भ

संपादन
  1. ^ "पद्म पुरस्कार मार्गदर्शिका (१९५४–२०१४)" (PDF). p. 98. Archived from the original (PDF) on 2017-09-14. 22 March 2016 रोजी पाहिले.
  2. ^ "ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचे हृदयविकाराने निधन".