ट्रायडेंट हॉटेल

(ओबेरॉय ट्रायडेंट हॉटेल या पानावरून पुनर्निर्देशित)

ऑबेरॉय ट्रायडेंट भारतातील हॉटेलसाखळी आहे. भारतामधील काही शहरांमध्ये आणि जगामध्ये ऑबेराय समूहाच्या मालकीची हॉटेल्स आणि रिझोर्ट्स असून ऑबेराय आणि ट्रायडेंट ही दोन वेगवेगळी पंचतारांकित हॉटेल त्यांच्याकडून चालविली जातात. एकाच ठिकाणी ही दोन हॉटेल एकत्र असतात तेव्हा त्या समूहाला ऑबेराय ट्रायडेंट असे म्हणतात.

ओबेरॉय ट्रायडेंट, मुंबई.

सुरुवातीच्या काळात ऑबेरॉय टॉवर्स किंवा ऑबेराय शॅरोटन या नावाने ही हॉटेल्स ओळखली जात होती. २००४ पासून एप्रिल २००८ च्या दरम्यान हिल्टन हॉटेल्स कॉर्पोरेशन आणि ऑबेरॉय हॉटेल व रिझोर्ट यांच्यामध्ये करार झाल्यावर ही हॉटेल्स हिल्टन हॉटेल्स म्हणून ओळखली जात होती. एप्रिल २००८ पासून ही हॉटेल्स ट्रायडेंट टॉवर्स म्हणून ओळखले जाते.[]

ऑबेरॉय हॉटेल आणि रिझॉर्ट्स आणि ट्रायडेंट हॉटेल मुंबईमध्ये नरीमन पॉइंट येथे असून ते ऑबेरॉय, मुंबई आणि ट्रायडेंट, नरीमन पॉइंट या नावाने ओळखली जातात. ऑबेरॉय हॉटेल्स आणि रिझोर्ट्सच्या मालकीची ही दोन्ही हॉटेल असून त्यांच्याकडून चालविली जातात. या दोन्ही हॉटेलच्या वेगवेगळ्या इमारती असून दोन्ही इमारती एका सामायिक रस्त्यानी जोडलेल्या आहेत.[]

मालकी

संपादन

पी.आर.एस. ऑबेरॉय या ऑबेरॉय कुटुंबातील सर्वांत वयोवृद्ध असणाऱ्या गृहस्थाकडे इआयएच लिमिटेड या कंपनीमधील ३२.११ टक्के भाग आहे. आयटीसी लिमिटेडचे १४.९८ टक्के भाग इआयएच लिमिटेड मध्ये गुंतलेले आहेत. परंतु काही ठराविक काळानंतर आयटीसी लिमिटेडचे १५ टक्के भाग असून ऑबेराय कुटुंबाने इआयएच लिमिटेड कंपनीमधील १४.१२ टक्के भाग मुकेश अंबानीच्या रिलायन्स इंडस्ट्रीज इनवेस्टमेंट आणि होल्डींग प्रा.लि. यांच्या नावे केलेले आहेत. ३० ऑगस्ट, २०१० रोजी रु.१०२१ करोड किंमतीचा हा करार झाला असून नुकताच रिलायन्स इंडस्ट्रीजचा भाग २० टक्क्यांपर्यंत वाढविलेला आहे.

नोव्हेंबर २००८चा दहशतवादी हल्ला

संपादन

२६ नोव्हेंबर, २००८ रोजी ऑबेरॉय, मुंबई आणि ट्रायडेंट, नरीमन पॉइंट ही हॉटेलस दहशतवादयांनी कब्ज्यात घेऊन हॉटेलमधील पर्यटकांना ओलीस धरले होते. ३ दिवस चाललेल्या धुमश्चक्रीमध्ये ३२ कर्मचारी आणि पर्यटक मारले गेले होते.[]

हॉटेल्सची यादी

संपादन

ऑबेराय हॉटेल्स आणि रिझोर्टस

संपादन

भारतामधील :-

संपादन
  • द ऑबेरॉय, नवी दिल्ली
  • द ऑबेरॉय, बंगळूर
  • द ऑबेरॉय ग्रॅड, कोलकाता
  • द ऑबेरॉय, मुंबई
  • द ऑबेरॉय अमरविलास, आग्रा
  • द ऑबेरॉय राजविलास, जयपूर
  • द ऑबेरॉय उदयविलास, उदयपूर (चौथ्या क्रमांकाचे जगातील सर्वोत्तम हॉटेल)
  • वाइल्डफ्लॉवर हॉल, हिमालयातील सिमला
  • द ऑबेरॉय सेसील, सिमला
  • द ऑबेरॉय, मोटर वेसल वृंद, बॅकवॉटर क्रुसर, केरळ
  • द ऑबेरॉय वन्यविलास, रणथंबोर
  • द ऑबेरॉय, गुरगाव

इंडोनेशियामधील

संपादन
  • द ऑबेरॉय, बाली
  • द ऑबेरॉय, लंबोक

मॉरिशसमधील

संपादन
  • द ऑबेरॉय, मॉरिशस

इजिप्तमधील

संपादन
  • द ऑबेरॉय, सहल हशिश, रेड सी
  • द ऑबेरॉय झाहरा, लक्झरी नाईल क्रुसर
  • द ऑबेरॉय फिले, नाईल क्रुसर

सौदी अरेबियामधील

संपादन
  • द ऑबेरॉय, दुबई

ट्रायडेंट हॉटेल्स

संपादन

भारतामधील

संपादन
  • ट्रायडेंट, आग्रा
  • ट्रायडेंट, भुवनेश्वर
  • ट्रायडेंट, चेन्नई
  • ट्रायडेंट, कोइंबतूर
  • ट्रायडेंट, कोचीन
  • ट्रायडेंट, गुरगांव
  • ट्रायडेंट, जयपूर
  • ट्रायडेंट, वांद्रे कुर्ला संकुल, मुंबई
  • ट्रायडेंट, नरीमन पॉइंट, मुंबई
  • ट्रायडेंट, उदयपूर

भारतामधील इतर समूहाची हॉटेल

संपादन
  • क्लार्कस हॉटेल, सिमला
  • मेडेनस हॉटेल, दिल्ली

संदर्भ

संपादन
  1. ^ "हिल्टन मुंबई वरून ट्रायडेंट टॉवर्स असे नामांतर" (इंग्रजी भाषेत).
  2. ^ "ऑबेराय ट्रायडेंट हॉटेल चे मुंबईमधील स्थान" (इंग्रजी भाषेत).
  3. ^ रायस, ब्लॅकली. "अतिश्रीमंतांसाठी उच्च अभिरुचीचे हॉटेल शहरात साकार, लंडन" (इंग्रजी भाषेत).[permanent dead link]
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: