ओकोतेलोल्को (कधीकधी ओकोतेलुल्को असाही उच्चार केला जातो), हे कोलंबसपूर्व त्लाक्सकाली संघराज्यातील चार स्वतंत्र अल्तेपेत्लांपैकी एक होते. ते जरी चार अल्तेपेत्लांत स्थापन झालेले दुसरे अलेपेत्ल असले तरी, मेक्सिकोवरील स्पॅनिश पादाक्रांतिकाळी तिसात्लानसह बलवान मित्रसंघराज्यांपैकी एक होते. ओकोतेलोल्कोमध्ये मुख्य बाजारपेठ असल्यामुळे आर्थिक सत्ता ह्या अल्तेपेत्लच्या ताब्यात होती, तर तिसात्लानकडे लष्करी सत्ता होती, आणि त्लाक्सकाली सैन्यावर त्यांचा ताबा होता. जेव्हा स्पॅनिश लोक मेक्सिकोमध्ये आले तेव्हा ह्या अल्तेपेत्लवर माशिश्कात्सिन राज्य करित होता. एकामागोमाग घडलेल्या राजकीय घटनांनी ओकोतेलोल्कोने पादाक्रांतीच्या शेवटी तिसात्लानवर वर्चस्व मिळविले.

ओकोतेलोल्कोचे चिन्हचित्र

संदर्भ

संपादन