ऑपरेशन गंगा
ऑपरेशन गंगा हे २०२२ च्या युक्रेनवरील रशियन आक्रमणाच्या दरम्यान भारतीय नागरिकांना युक्रेनमधून बाहेर काढण्यासाठी भारत सरकारची एक निर्वासन मोहीम. यात भारतीय परराष्ट्र मंत्रालय आणि भारतीय सैन्याने भाग घेतला. या मोहीमेदरम्यान बस आणि रेल्वेने भारतीयांना युक्रेनच्या पश्चिम सीमेवर आणले गेले आणि तेथून त्यांना बुखारेस्ट, बुडापेस्ट, वॉर्सा तसेच इतर शहरांमार्गे भारतात आणण्यात आले.
स्वरूप
संपादनयुक्रेनमध्ये भारताचे सुमारे २० हजार भारतीय नागरिक होते, त्यापैकी १८ हजार विद्यार्थी होते. यांतील बहुसंख्य व्यक्ती या मोहीमेद्वारे भारतात परतले. २६ फेब्रुवारी, २०२२ रोजी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबद्दल चर्चा केली. भारताचे चार केंद्रीय मंत्री – हरदीप सिंग पुरी , ज्योतिरादित्य सिंधिया , किरेन रिजिजू आणि जनरल व्ही.के. सिंग हे २६ फेब्रुवारी २०२२ रोजी युक्रेन शेजारील देशांमध्ये स्थानिक अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्यासाठी गेले. या मोहीमेंतर्गत पहिले उड्डाण २६ फेब्रुवारी रोजी रोमानियातील बुखारेस्ट येथून झाले. मिकोलेव बंदरात अडकलेल्या भारतीय खलाशांना आणि इतर देशांतील अनेक खलाशांनाही यामार्गे निर्वासन करता आले. भारतीय विद्यार्थ्यांनी आपले नागरिकत्व दाखविण्यासाठी त्यांच्या वाहनांवर भारताचा ध्वज लावला होता.
प्रशासन
संपादनयुक्रेनमधील सर्व मोहिमा आणि कर्मचारी यांच्याशी समन्वय साधण्यासाठी संयुक्त सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली होती. मोहिमांना भारतातील रशियन भाषिक अधिकाऱ्यांनीही मदत केली होती. इस्रायल, तुर्की, रशिया आणि येथील मुख्यालयातून या प्रदेशातील भारतीय मिशनला पाठिंबा देण्यासाठी अतिरिक्त भारतीय राजनैतिक कर्मचारी पाठवण्यात आले होते.[१]
इतर देशाच्या नागरिकांना मदत
संपादनभारतीय दूतावासाने इतर देशांतील अनेक नागरिकांनाही युक्रेनमधून बाहर पडण्यास मदत केली. यांत मिकोलेवमधील दोन लेबेनी आणि तीन सीरियन खलाशी, नऊ बांगलादेशी नागरिक, एक पाकिस्तानी नागरिक तसेच नेपाळी आणि ट्युनिशियन विद्यार्थ्यांचा समावेश होता. यांना विमानांतून आधी भारतात आणले गेले. युद्धग्रस्त युक्रेनमधून बांगलादेशींची सुटका केल्याबद्दल शेख हसीना यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले.[२]
शेवट
संपादनया मोहीमेंतर्गत भारतीयांनी युक्रेनचे सुमी शहर गाढले. तेथून सुमारे ६०० प्रवाशांना १३ बसेसद्वारे पोलंडमधील रझेझो विमानतळावर आणण्यात आले व तेथून तीन विमानांतून त्यांना भारतात आणले गेले.
विमाने
संपादनया मोहीमेत भारतीय वायुसेनेची सी-१७ ग्लोबमास्टर-३ ही महाकाय विमाने सामील होती. एर इंडिया, इंडिगो, एर इंडिया एक्स्प्रेस आणि स्पाइसजेट या खाजगी विमानवाहतूक कंपन्यांनी मदत केली.
हे सुद्धा पहा
संपादन- ऑपरेशन राहत - येमेनमधून भारतीय रहिवाशांची सुटका
- ऑपरेशन संकट मोचन - २०१६मध्ये दक्षिण सुदान
- ऑपरेशन सेफ होमकमिंग - पहिली लिबियन यादवी
- ^ Haidar, Suhasini; Bhattacherjee, Kallol (2022-03-09). "Modi calls Hungarian PM as Operation Ganga enters last phase" (इंग्रजी भाषेत). New Delhi. ISSN 0971-751X.
- ^ "Operation Ganga: Sheikh Hasina thanks PM Modi for rescuing Bangladeshis from war-hit Ukraine". WION (इंग्रजी भाषेत). 2022-03-12 रोजी पाहिले.