ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर

भारतीय नेमबाज


ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर ( 3 फेब्रुवारी २००१, रतनपूर, जिल्हा: खारगोन, मध्यप्रदेश) हा भारतीय नेमबाज आहे.[] २०१९ च्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत ५० मीटर रायफल थ्री पोझिशन्स स्पर्धेत त्याने कांस्यपदक जिंकले आणि २०२० च्या उन्हाळी ऑलिम्पिकसाठी भारताकरता कोटा मिळवला.

ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर
ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर
वैयक्तिक माहिती
जन्मजात नाव रतनपूर, मध्य प्रदेश
पूर्ण नाव ऐश्वर्य प्रताप सिंह वीर बहादूर तोमर
राष्ट्रीयत्व भारतीय
निवासस्थान भारत
जन्मदिनांक ३ फेब्रुवारी, २००१ (2001-02-03) (वय: २३)
खेळ
देश भारत
खेळ नेमबाजी
प्रशिक्षक वैभव शर्मा, सुमा शिरूर

सुरुवातीचे आयुष्य

संपादन

तोमरचा जन्म ३ फेब्रुवारी २००१ रोजी मध्य प्रदेशातील खारगोन जिल्ह्यातील रतनपूर गावात झाला. तीन भावंडांपैकी तो सर्वात धाकटा आहे.[] तो बऱ्याचदा त्याचे जमीनदार वडील वीर बहादूर यांच्याबरोबर शिकार करायला जात असे. चुलतभाऊ नवदीपसिंग राठौर यांच्याकडून त्याला नेमबाजी या खेळाबद्दल कळले. तोमरने २०१५ मध्ये भोपाळमधील मध्य प्रदेश नेमबाजी अकादमीमध्ये वैभव शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली नेमबाजीचे प्रशिक्षण घेणे सुरू केले.[][]

कारकीर्द

संपादन

तोमरने 2019च्या आशियाई एरगन चॅम्पियनशिपमध्ये ज्युनियर 10 मीटर एर रायफल स्पर्धेत कांस्यपदक जिंकले.[] सुहल येथे २०१९ च्या आयएसएसएफ ज्युनियर विश्वचषकात तोमरने ४५९.३  गुणांसह 50 मीटर रायफल थ्री पोझिशन्समध्ये कनिष्ठ गटात जागतिक विक्रम नोंदविला आणि सुवर्णपदक जिंकले.[]

तोमरने दोहा येथे 2019 मध्ये झालेल्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत 50 मीटर रायफल थ्री पोझिशन्समध्ये  अंतिम फेरीत ४४९.१ गुण मिळवत कांस्यपदक जिंकले. अशाप्रकारे त्याने भारतासाठी नेमबाजीतील या प्रकारासाठी २०२० च्या उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये दुसरा कोटा मिळवला.[] त्याने याच स्पर्धेत चैन सिंग आणि पारूल कुमार यांच्या साथीने सांघिक स्पर्धेत कांस्य पदक जिंकले.[]

पुरस्कार

संपादन

मध्य प्रदेश सरकारचा एकलव्य पुरस्कार: २०१९[]

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "ISSF - International Shooting Sport Federation - issf-sports.org". www.issf-sports.org. 2021-03-27 रोजी पाहिले.
  2. ^ a b Jul 15, Ramendra Singh / TNN /; 2018; Ist, 00:34. "Khargone farmer's son sets new shooting national record | Bhopal News - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-03-27 रोजी पाहिले.CS1 maint: numeric names: authors list (link)
  3. ^ "ISSF Junior World Cup: Aishwarya Pratap Singh Tomar, the calm and happy shooter from Khargone who clinched gold - Sports News , Firstpost". Firstpost. 2019-07-20. 2021-03-27 रोजी पाहिले.
  4. ^ Sportstar, Team. "Asian Airgun C'ships: Shreya breaks world junior record". Sportstar (इंग्रजी भाषेत). 2021-03-27 रोजी पाहिले.
  5. ^ Sportstar, Team. "Junior World Cup: Aishwarya Singh Tomar creates world record, clinches gold". Sportstar (इंग्रजी भाषेत). 2021-03-27 रोजी पाहिले.
  6. ^ PTI. "Aishwarya Singh Tomar bags India's 13th Olympic quota in shooting". Sportstar (इंग्रजी भाषेत). 2021-03-27 रोजी पाहिले.
  7. ^ "Teenager Aishwary Pratap Singh Tomar Secures India's Record 13th Olympic Quota in Shooting". www.news18.com (इंग्रजी भाषेत). 2019-11-10. 2021-03-27 रोजी पाहिले.
  8. ^ "भोपाल में सीएम व खेलमंत्री ने किया सन्मान: एकलव्य पुरस्कार से सन्मानित हुए रतनपुर के ऐश्वर्य". Dainik Bhaskar (हिंदी भाषेत). 2020-12-29. 2021-03-27 रोजी पाहिले.