एरिस (बटु ग्रह)
सूर्यमालेतील प्लुटोच्या पलीकडे असलेला बटू ग्रह
एरिस (चिन्ह: ,[१] इंग्रजी: Eris) हा बटुग्रह १३६१९९ एरिस या नावानेही ओळखला जातो. त्याची कक्षा प्लूटोच्याही पलीकडे असून त्याला डिस्नोमिया नावाचा उपग्रह आहे. एरिसचा शोध जानेवारी ५, इ.स. २००५ रोजी एम. इ. ब्राऊन व सी. ए. ट्रुजिलो यांनी लावला. एरिस हा सूर्यमालेतील, वजनाने व आकारमानाने सर्वांत मोठा बटुग्रह आहे.