एन. बाला देवी
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
https://en.wikipedia.org/wiki/Ngangom_Bala_Devi (3)
वैयक्तिक माहिती | |
---|---|
जन्म |
२ फेब्रुवारी, १९९० मणिपूर, भारत |
नागंगोम बाला देवी (२ फेब्रुवारी, १९९० - ) ही भारतीय महिला फुटबॉल खेळाडू आहे. ती भारतीय महिला राष्ट्रीय फुटबॉल संघासाठी आणि रेंजर्स एफ.सी. या स्कॉटिश महिला प्रीमियर लीग क्लबसाठी फॉरवर्ड म्हणून खेळते. २०२० मध्ये रेंजर्स एफ.सी.बरोबर करार केल्यानंतर बाला देवी भारताची पहिली महिला व्यावसायिक फुटबॉल खेळाडू ठरली.
वैयक्तिक जीवन आणि पार्श्वभूमी
संपादनबाला देवीचा जन्म ईशान्य भारतातील मणिपूर राज्यात झाला. तिथेच तिचे बालपणही गेले. मणिपूरमध्ये फुटबॉल खूप लोकप्रिय खेळ असून तेथील महिला संघाने आतापर्यंत झालेल्या २५ राष्ट्रीय चॅम्पियनशिप्सपैकी २० स्पर्धांचे जेतेपद पटकावले आहे.
घरातूनच फुटबॉलचा वारसा लाभलेली बाला देवी लहानपणीच फुटबॉल खेळू लागली होती. तिचे वडील छंद म्हणून फुटबॉल खेळत. त्यांच्याबरोबर तिचा मोठा भाऊ आणि तिची जुळी बहीणसुद्धा खेळत असत. [2] मात्र व्यावसायिक पातळीवर फुटबॉल खेळणारी ती तिच्या कुटुंबातील पहिलीच व्यक्ति आहे. फुटबॉलबरोबरच ती टेनिस आणि हँडबॉल देखील खेळते.
वयाच्या ११व्या वर्षी तिने आयसीएसए या मुलींच्या एका स्थानिक फुटबॉल क्लबमध्ये प्रवेश घेतला. यामुळे तिला जिल्हास्तरीय आणि पुढे राज्य संघाकडून खेळता आले.
ब्राझीलचे फुटबॉल खेळाडू रोनाल्डो आणि रोनाल्डिन्हो देवीचे बालपणी हिरो होते. आणि आता अमेरिकन महिला संघाची मिडफिल्डर आणि सह-कर्णधार मेगन रॅपिनो तिला प्रेरित करते. पुरुष फुटबॉल खेळाडूंपैकी पोर्तुगीज फुटबॉल खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो तिचा आवडता खेळाडू आहे. [1]
बाला देवीने अनेक मुलाखतींमध्ये या खेळात प्रवेश करण्यास इच्छुक असलेल्या भारतीय महिलांपुढील आव्हानांबद्दल उल्लेख केला. सुरुवातीला, कुटुंबीयांचा पाठिंबा असूनही, तिला भारतीय फुटबॉल क्षेत्रातील पुरुषी वर्चस्वाला तोंड द्यावे लागले. त्यामुळे तिला सुरुवातीला मुलांच्या सामन्यांमध्ये खेळावे लागत असे. देवीला वाटते की महिंलासाठी विशेष लीग सुरू झाल्यामुळे आता देशातील परिस्थिती सुधारत आहे. [2]
व्यावसायिक यश
संपादनवयाच्या १५ व्या वर्षी २००५ मध्ये बाला देवीने भारतीय राष्ट्रीय संघात पदार्पण केले. [2] त्यानंतर तिने पाच वर्ष राष्ट्रीय संघाचे नेतृत्व केले आणि देशासाठी सर्वोधिक गोल नोंदविणारी खेळाडूही ठरली. गेल्या दशकात तिने ५८ सामन्यांत ५२ गोल केले. [2]
देवीने राष्ट्रीय पातळीवर १०० पेक्षा जास्त गोल केले आहेत. तिच्या या यशामुळे २०१० साली तिला मणिपूर पोलिसात भर्ती करण्यात आले. त्यामुळे इंडियन वुमन लीगमध्ये तिने मणिपूर पोलीस स्पोर्ट्स क्लबसह एकूण तीन वेगवेगळ्या क्लब्सचे प्रतिनिधित्व केले होते.
इंडियन वुमेन्स लीगच्या दोन हंगामांमध्ये बाला देवी सर्वोच्च गोल नोंदविणारी खेळाडू ठरली. २०१५ आणि २०१६ मध्ये बाला देवीला ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन (एआयएफएफ) तर्फे वुमन प्लेअर ऑफ दि इयर पुरस्काराने गौरविण्यात आले. [1]
जेव्हा रेंजर्स एफसीने तिला ऑफर दिली, तेव्हा ती मणिपूर पोलीस स्पोर्ट्स क्लबकडून खेळत होती. जानेवारी २०२० मध्ये तिने त्यांच्याबरोबर ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी केली. भारतीय संघाकडून खेळताना बाला देवी १० नंबरची जर्सी घालते, आणि तिच्या रेंजर्स एफसीच्या जर्सीचा सुद्धा हाच क्रमांक आहे.
बाला देवीच्या आधी गोलकीपर अदिती चौहान २०१५ मध्ये वेस्टहॅम युनायटेडकडून खेळली होती, परंतु तिने व्यावसायिक करारावर स्वाक्षरी केली नव्हती. हा पराक्रम फक्त बाला देवीने गाजवला आहे. रेंजर्सच्या आणि भारतातील बेंगळुरू फुटबॉल क्लब यांच्या भागीदारीमुळे हा करार शक्य झाला. [1]
संदर्भ
संपादनhttps://www.bbc.com/news/world-asia-india-51369810 [1]
https://www.cnbc.com/2020/02/19/how-ngangom-bala-devi-became-indias-first-pro-female-soccer-player.html [2]