एडॉन मॅक्सहुनी (जन्म - २१ मे १९८८) हा एक फिन्निश बास्केटबॉल खेळाडू आहे.[१]

कारकिर्द संपादन

मॅक्सहुनीचे आई-वडील कोसोव्हो या देशातून आले आहेत. स.न. १९९२ मध्ये ते फिनलंडला स्थलांतरीत झाले होते.[२] त्याचे वडील, बेसिम मॅक्सहुनी हे एक स्पर्धात्मक बास्केटबॉल खेळाडू होते. नंतर ते प्रशिक्षक बनले. [३]

एडॉन मॅक्सहुनी याने फिन्निश बास्केटबॉल असोसिएशनच्या युवा अकादमीमध्ये प्रशिक्षण घेतले होते. त्याने २०१७ मध्ये ती अकादमी सोडली.[४] त्यानंतर तो कॅलिफोर्निया, यूएसए मधील लाँग बीच स्टेट युनिव्हर्सिटी येथे बास्केटबॉलचा अभ्यास करण्यासाठी आणि खेळण्यासाठी गेला. २०१९ पर्यंत, पॉइंट गार्डने कॉलेज संघासाठी त्याने एकूण ६७ गेम खेळले. यामध्ये त्याने प्रति गेम सरासरी ६.७ गुण मिळवले.[५] २०१९-२० च्या हंगामात, त्याने स्पॅनिश तृतीय-विभाग संघ सीबी ग्रॅन कनेरिया क्लारेट एसएडी सोबत करार केला होता. त्यात त्याने २४ लीग गेम खेळले होते. यामध्ये त्याने प्रति गेम सरासरी १३.३ गुण मिळवले होते.[६]

केके प्रनु सह त्याने एक हंगाम खेळला.त्यामुळे तो एस्टोनियन उप-चॅम्पियन बनला.[४] मॅक्सहुनी न्यू हिरोज डेन बॉशसाठी २०२२ मध्ये खेळला आणि त्यात तो संघाचा सर्वोच्च स्कोअरर बनला. त्याने डच चॅम्पियनशिप जिंकली.[७] सप्टेंबर २०२२ मध्ये, मॅक्सहुनीने जर्मन बुंडेस्लिगा संघ क्रेलशेम मर्लिन्स कडून ऑफर स्वीकारली.[८]

राष्ट्रीय संघ संपादन

मॅक्सहुनीला कोसोवो राष्ट्रीय बास्केटबॉल संघाकडून खेळण्याची ऑफर देखील प्राप्त झाली होती परंतु त्यांनी नकार दिला.[२] हा फिन्निश युवा राष्ट्रीय खेळाडू होता. त्याने 2014 मध्ये U16 युरोपियन चॅम्पियनशिप आणि 2015 आणि 2016 मध्ये FIBA U18 युरोपियन चॅम्पियनशिप यासारख्या स्पर्धांमध्ये भाग घेतला. [१] युरोबास्केट 2022 दरम्यान, त्याने सात स्पर्धा सामन्यांमध्ये प्रति गेम सरासरी 8.9 गुण मिळवले. [९]

२०२३ फिबा बास्केटबॉल विश्वचषक स्पर्धेत तो फिनलंडच्या राष्ट्रीय बास्केटबॉल संघासोबत खेळला होता.[१०]

संदर्भ संपादन

  1. ^ a b "Edon Maxhuni profile, FIBA U20 European Championship 2017". FIBA.COM. 2017-07-23. 2023-08-29 रोजी पाहिले.
  2. ^ a b "Kosovo roots, but a Finnish jersey on his back, Maxhuni faces emotional summer". FIBA.basketball. 2016-12-18. 2023-08-29 रोजी पाहिले.
  3. ^ boldUnderline. llc. "Besim Maxhuni në krye të Raiders Basket". TopSporti.com (अल्बानियन भाषेत). 2023-08-29 रोजी पाहिले.
  4. ^ a b "Pelaaja". Basket.fi (फिनिश भाषेत). 2023-08-29 रोजी पाहिले.
  5. ^ "Edon Maxhuni - Men's Basketball". Long Beach State University Athletics. 2018-07-01. 2023-08-29 रोजी पाहिले.
  6. ^ "Competiciones FEB". competiciones.feb.es (स्पॅनिश भाषेत). 2023-08-29 रोजी पाहिले.
  7. ^ "Heroes Den Bosch basketball, News, Roster, Rumors, Stats, Awards, Transactions, Details-eurobasket". Eurobasket LLC. 2023-08-29 रोजी पाहिले.
  8. ^ "Point Guard Edon Maxhuni komplettiert HAKRO Merlins-Kader – Vertrag mit Prince Ali aufgelöst". HAKRO Merlins Crailsheim (जर्मन भाषेत). Archived from the original on 2023-03-19. 2023-08-29 रोजी पाहिले.
  9. ^ "Edon MAXHUNI at the FIBA EuroBasket 2022". FIBA.basketball. 1998-03-21. 2023-08-29 रोजी पाहिले.
  10. ^ "Finland at the FIBA Basketball World Cup 2023 European Qualifiers". FIBA.basketball (इंग्रजी भाषेत). 2023-08-29 रोजी पाहिले.