एडमंड (ओक्लाहोमा)
(एडमंड, ओक्लाहोमा या पानावरून पुनर्निर्देशित)
एडमंड हे अमेरिकेच्या ओक्लाहोमा राज्यातील शहर आहे. हे ओक्लाहोमा सिटी शहराचे उपनगर आहे. २०१० च्या जनगणनेनुसार एडमंडची लोकसंख्या ८१,४०५ होती.
१८८७मध्ये सांता फे रेल लाइनने याठिकाणी रेल्वे इंजिनांना पाणी व कोळसा भरण्याचे स्थानक उभारले होते. हे ठिकाण लांबपर्यंतच्या प्रदेशातील सर्वाधिक उंचीवर असल्यामुळे हे ठिकाण निवडले होते. याला सांता फे रेल लाइनच्या सामानवाहतूक एजंट एडमंड बर्डिकचे नाव दिले गेले. पुढे १८८९मध्ये शहराची स्थापना होताना हेच नाव वापरले गेले.