एकलहरे (खेड)
एकलहरे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.गावची लोकसंख्या ही अंदाजे ८५० ते ९०० आहे.गावचे ग्रामदैवत आदिशक्ती मुक्ताई माता असून गावच्या उत्तरेला सुंदर छोटेसे मंदिर आहे.दरवर्षी मार्च महिन्यात रंगपंचमी या दिवशी आईचा उत्सव (यात्रा) भरते.यावेळी आईचा पालखी सोहळा असतो.गावामध्ये मारूती मंदिर,मरीआई मंदिर ही इतर मंदिरे असून मारूती मंदिरासमोरील पिंपळाचा खूप जुना वृक्ष असून वृक्षाच्या खोडाशी मुंजोबा देव आहे.गावच्या दक्षिणेला भिमा नदी वाहते.याच नदीच्या बाजूला ग्रामदैवत मुक्ताई मातेचे जुने मंदिर होते.परंतू चासकमान प्रकल्प झाल्यावर हे मंदिर पाण्याखाली गेले.आता जे गावात मंदिर आहे.ते नंतर ग्रामस्थांनी बांधले.गावच्या पुर्वेला डोंगरावर वनदेवाचे मंदिर आहे.या गावातील लोकांना मुख्य बाजारपेठ ही जवळच ३ कि.मी अंतरावरील डेहणे गाव असून तेथे बुधवारी आठवडी बाजार भरतो.गावामध्ये ४ थी पर्यंत जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे.येथील लोकांचा मुख्य व्यवसाय हा शेती आणि त्यात प्रामुख्याने भात शेती आहे.काही लोक भातशेती बरोबरच दुग्धव्यवसाय ही करतात.गावची संयुक्त ग्रामपंचायत आहे.यामध्ये एकलहरे गावठाण, बांगरवाडी, आंबेकरवाडी, धामणगाव बुद्रुक यांचा समावेश असून ग्रामपंचायत सभासद संख्या ७ आहे.गावामध्ये बांगर, आंबेकर,डामसे,भोपळे, भालेराव,वाजे, बोराडे,ठोसर,बुरूड,भोजणे,मदगे,हि आडनावे आहेत.सध्या दळणवळणाची उत्तम सुविधा असून डेहणे-शेंदूर्ली मार्गे तसेच वाडा -वाळद मार्गे गावात जाण्यासाठी रस्ता आहे.तर नदीमधून जाण्यासाठी नाव(होडीची) व्यवस्था आहे.तालुक्याचे ठिकाण असलेले खेड (राजगुरुनगर)पासून हे गाव ४५ कि.मी.तर १२ ज्योतीर्लिंगापैकी असलेले श्री क्षेत्र भीमाशंकर पासून हे गाव २५ कि.मी अंतरावर आहे.
?एकलहरे महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | खेड |
जिल्हा | पुणे जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
भौगोलिक स्थान
संपादनहवामान
संपादनयेथे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात भरपूर पाऊस पडतो.जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, नोव्हेंबर आणि डिसेंबर या कालावधीत कोरडे हवामान असते.जुलै महिना हा सर्वात आर्द्र महिना असतो.मार्च हा सर्वात शीतल महिना असतो. वार्षिक पर्जन्यमान २,२६० मिमी असते.