एअरटेल पेमेंट्स बँक
एअरटेल पेमेंट्स बँक ही पब्लिक लिमिटेड कंपनी असून त्याचे मुख्यालय नवी दिल्ली, भारत येथे आहे. ही कंपनी भारती एअरटेलची सहाय्यक (सबसिडरी) कंपनी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून पेमेंट्स बँक लायसन्स मिळवणारी ही भारतातील पहिली कंपनी आहे. ती देशातील पहिली थेट (डायरेक्ट) पेमेंट बँक बनली आहे. [२] ११ एप्रिल २०१६ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेने एअरटेल पेमेंट्स बँकेस बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट १९४९ च्या कलम २२ (१) अंतर्गत परवाना जारी केला. [३] एअरटेल पेमेंट्स बँक ही भारती एअरटेल लिमिटेड आणि कोटक महिंद्रा बँक लिमिटेड यांचा संयुक्त उद्योग आहे. एअरटेल पेमेंट्स बँकेत कोटक महिंद्रा बँकेचा १९.९% हिस्सा आहे तर उर्वरित ८०.१% हिस्सा भारती एअरटेल लिमिटेड कडे आहे.
प्रकार | सार्वजनिक कंपनी |
---|---|
उद्योग क्षेत्र | आर्थिक सेवा |
स्थापना | २०१७ |
मुख्यालय | नवी दिल्ली, भारत |
सेवांतर्गत प्रदेश | भारत |
महत्त्वाच्या व्यक्ती | अनुभ्रता बिस्वास (एमडी, सीईओ)[१] |
उत्पादने | बँकिंग |
पालक कंपनी | भारती एअरटेल लिमिटेड (८०.०१%) कोटक महिंद्रा बँक (१९.९%) |
संकेतस्थळ |
www |
संदर्भ
- ^ "Airtel Payments Bank ropes in Anubrata Biswas as its chief executive". telecom.economictimes.indiatimes.com. 25 May 2018 रोजी पाहिले.
- ^ Jain, Upasana (23 November 2016). "Airtel launches India's first payments bank". livemint.com.
- ^ "Airtel M-Commerce Services Ltd rechristened as Airtel Payments Bank Ltd Company unveils new brand identity". Bharti.com. 2017-01-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-01-13 रोजी पाहिले.