ॲनिमे

(ऍनिमे या पानावरून पुनर्निर्देशित)

आनिमे[], (जपानी : アニメ; इंग्लिश : Anime) ह्या कलेचा उदय जपानमध्ये झाला.

अ‍ॅनिमे पद्धतीने काढलेले मुलीचे चित्र

सगळ्यात पहिले जपानी ॲनिमेशन चित्र इ.स. १९१७मध्ये काढले गेल्याची नोंद आहे. ह्यानंतरच्या दशकांमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची जपानी चलचित्रे काढण्यात आली. मात्र विशिष्ट प्रकारची ॲनिमे शैली इ.स. १९६० च्या दशकात उदयास आली. ह्यात महत्त्वाचे योगदान असलेले ओसामू तेझुका.[] ह्यांचे काम इ.स. १९८० च्या दशकांनंतर जपानबाहेर पसरू लागले . मांगा(???) प्रमाणेच ॲनिमेची लोकप्रियता जपानमध्ये भरपूर आहे. तसेच जगभरातही त्याचे चाहते आहेत. ह्याचे वितरक ॲनिमेचा प्रसार दूरचित्रवाणीच्या मदतीने करू शकतात. इंटरनेटचा वापरही ॲनिमेशनच्या प्रसारासाठी होतो.

जपानी भाषेतल्या アニメーション (आनिमेशों) (animēshonचा), इंग्रजीतील animation ("अ‍ॅनिमेशन"चा) किंवा फ्रेंच भाषेतील animeé ("अनिमेटेड")चा ॲनिमे हा संक्षेप आहे.

ॲनिमेचे दोन प्रकार अस्तित्वात आहेत. एक हाताने काढलेले व दुसरे संगणकाच्या मदतीने बनवलेले. ह्ंयाचा वापर दूरचित्रवाणीवरच्या मालिका, चित्रपट, चित्रफिती, व्हीडिओ गेम्स, जाहिराती आणि इंटरनेटवरील क्लिप्स ह्या करिता होतो . जपानबाहेर ॲनिमेला सर्वांत पहिल्यांदा पूर्व आणि आग्नेय आशियामध्ये लोकप्रियता मिळाली, मग हळूहळू ते जगभर लोकप्रिय झाले.

इतिहास

संपादन

इ.स. १९३० च्या दशकापासून ॲनिमेशन चलचित्रे ही गोष्टी सांगण्यासाठी नवीन पर्याय घेऊन आली, आणि झपाट्याने लोकप्रिय झाली. पण त्यांना स्वतःच्या देशात व बऱ्याच अन्य देशांतील स्पर्धेला सामोरे जावे लागले. ह्यामध्ये नोबुरो ओफुजी आणि यासुरी मुराता हे तुलनेनी स्वस्त आणि साध्या कटआऊटवर काम करत होते. केन्झो मासओका आणि मित्सुयो सीओ ह्यांनी चलचित्रीकरणात वेगाने प्रगती केली. जपान सरकारनेही त्यांना मदत केली. पहिली बोलणारी ॲनिमे इ.स. १९३३ मध्ये मासाओका ह्यांनी प्रदर्शित केली. तिचे नाव होते चिकारा टू ओंनानो योनो नका. पहिला ॲनिमे चित्रपट होता, मोमोतारोझ दिविणे सी वाॅरिअर्स. हा सीओ ह्यांनी इ.स. १९४५मध्ये इम्पीरिअल जपानी नेव्हीच्या मदतीने प्रदर्शित केला होता ॲनिमेचा उगम विसाव्या शतकाच्या सुरुवातीला झाला. जपानी चित्रकार फ्रान्स, जर्मनी, अमेरिका आणि रशिया या देशांमधून आलेल्या चलचित्रांबरोबर प्रयोग करू लागले. सगळ्यात जुनी माहीत असलेली ॲनिमे इ.स. १९१७मध्ये प्रदर्शित झाली. दोन मिनिटाच्या ह्या ॲनिमेमध्ये सामुराईबद्दल माहिती दिली गेली होती. शिमोकावा ओटेन, जुनीची कौची आणि सेइतरो कित्यामा हे काही ॲनिमेशनकारांपैकी एक होते.

द वॉल्ट डिस्ने कंपनीचा इ.स. १९३७मध्ये आलेला चित्रपट 'स्नो व्हाइट अँड सेव्हन ड्वार्फ्स'ने जपानी चलचित्रकारांना खूप प्रभावित केले. इ.स. १९६० च्या दशकात मांगा[] कलाकार आणि चलचित्रकार ओसामू तेझुका ह्यांनी डिस्नेच्या चलचित्रांमध्ये सुधारणा करून त्यांनी ती अजून कमी खर्चिक आणि चांगल्या पद्धतीने कशी बनवता येतील याचा शोध लावला .

इ.स. १९७०च्या दशकात मांगा ह्या कलेच्या लोकप्रियतेमध्ये कमालीची वाढ झाली. बऱ्याच नंतर हे तंत्र चलचित्रांमध्ये बदलले गेले. ओसामू तेझुका ह्यामुळे बरेच नावाजले गेले. त्यांना गाॅड ऑफ मांगा म्हणूनही लोक संबोधत. जिला जपानबाहेर मेचा ह्या नावानी ओळखता ती रोबोटची कलाकृती तेझुका ह्यांनीच विकसित केली होती. तोमिनो ह्यांनी सुपर रोबोट आणि गो नगाई योश्युकी बनवली. इ.स. १९८० च्या दशकात ॲनिमेला जपानमध्ये खऱ्या अर्थाने मान्यता मिळाली. तिची वाढ इ.स. १९९० च्या दशकात झाली आणि ती एकविसाव्या शतकातदेखील चालूच आहे .

संदर्भ

संपादन

बाह्य दुवे

संपादन