ऊर्जा क्षेत्र ही एक बाजारपेठ आहे जिथे ऊर्जेचा व्यापार होतो व जिथून वेगवेगळ्या संस्था आणि कंपन्यांमार्फत घरे तसेच कारखान्यांना ऊर्जेचा पुरवठा केला जातो. या क्षेत्रात पारेषण-संलग्न बद्ध असणाऱ्या अनेक संस्था व कंपन्या विद्युत ऊर्जा तसेच नैसर्गिक वायूंची निर्मिती आणि वितरण करतात, ज्यासाठी सरकारी व काही खाजगी कंपन्या जबाबदार असतात.

भारतीय ऊर्जा क्षेत्रसंपादन करा

भारतात विद्युत ऊर्जा व द्रव आणि वायूरूपी इंधने पुरविण्यास काही सरकारी तसेच खाजगी कंपन्यांचा मोठा वाटा आहे.

विद्युत ऊर्जासंपादन करा

भारताच्या विद्युत ऊर्जा क्षेत्र हे जगातील सर्वात जास्त वैविध्यपुर्ण क्षेत्र आहे. जितकी ऊर्जा कोळसा, नैसर्गीक वायू, जलशक्ती अण्विकशक्ती, तेल या पारंपारिक स्त्रोतांपासून निर्माण होते, जवळपास तेवढीच विद्युत ऊर्जा पवनचक्की, सौर आणि शेत-कचरा यांपासून निर्माण होते. भारतात जानेवारी २०२० नुसार विज निर्मितीसाठी बांधलेल्या प्रकल्पांची एकूण क्षमता ३६८.६८ गीगावॅट (Gigawatt-GW) इतकी आहे.[१]

इंधनेसंपादन करा

महाराष्ट्रातील ऊर्जा क्षेत्रसंपादन करा

बहुतेक सर्व राज्यांत विद्युत ऊर्जा पुरवठा करण्यास काही सरकारी संस्था जबाबदार आहेत. तसे महाराष्ट्रात विद्युत ऊर्जेसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी व महाराष्ट्र राज्य पॉवर जनरेशन कंपनी जबाबदार आहेत.

संदर्भसंपादन करा

  1. ^ "Power Sector in India: Market Size, Industry Analysis, Govt Initiatives | IBEF (Govt. Trust)". www.ibef.org. 2020-05-28 रोजी पाहिले.