उर्जनगर ही महाराष्ट्र राज्य पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड ( महानिर्मिती ) द्वारे संचालित चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन (सीएसटीपीएस) मधील कर्मचाऱ्यांसाठी निवासी वसाहत आहे. ही वसाहत चंद्रपूरपासून अंदाजे ६ कि.मी. अंतरावर आहे.

चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्र

संपादन

चंद्रपूर हे महानिर्मितीचे सर्वात मोठे औष्णिक उर्जा केंद्र आहे आणि सर्व राज्य विद्युत मंडळांमधील हे भारतातील सर्वात मोठे आहे. महाराष्ट्रातील २५% विजेचे योगदान सीएसटीपीएस करत असत. या उर्जा केंद्राची क्षमता २३४० मेगावॅट आहे. या केंद्रामध्ये २१० मेगावॅटची ४ युनिट आणि प्रत्येकी ५०० मेगावॅटची३ युनिट आहेत, तर ५०० मेगावॅटच्या दोन युनिटचे बांधकाम सुरू आहेत.

एकेकाळी हा प्रकल्प आशिया खंडातील सर्वात मोठा औष्णिक उर्जा केंद्र होता. महागेनकोने प्रायोगिक तत्त्वावर सौर उर्जा प्रकल्प सुरू केला असून या क्षेत्रात रोजगाराच्या संधींमध्ये भर घालून आणखी दोन युनिट तयार करण्याची योजना आखली आहे.

औष्णिक विद्युत केंद्राची स्थापना झाल्यावर रहिवासी दरवर्षी वर्धापन दिन साजरा करतात.

जनांकिकी

संपादन

उर्जनगरची लोकसंख्या अंदाजे १०,००० आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या अगदी जवळील स्थान असल्यामुळे उन्हाळ्याच्या काळात पाण्याचे शोध घेताना स्थलांतर झालेले वाघ आणि अस्वल यांचे दर्शन बरेचदा होते.

सुविधा

संपादन

कॉलनी ए / बी / सी / डी / ई आणि एफ प्रकारांमध्ये विभागली गेली आहे. प्रत्येक प्रकारात इमारतींची एक निश्चित संख्या असते आणि प्रत्येक इमारतीत ४, ६ किंवा १२ निवासस्थान (क्वार्टर) असतात. ओआरसी आणि डब्ल्यूआरसी हे दोन क्लब बॅडमिंटन, टेबल टेनिस, कॅरम, बुद्धीबळ, लॉन टेनिस आणि क्रिकेट, फुटबॉल आणि इतर विविध प्रकारच्या करमणुकीच्या मैदानासह खेळासाठी सुविधा पुरवतात. यात कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थींसाठी "चेमारी" नावाचे एक गेस्ट हाऊस आहे आणि उच्च कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापकीय पाहुणे आणि विशेष मन्यवर व्यक्तींसाठी "हिराई" नावाचे व्हीआयपी गेस्ट हाऊस आहे.

शिक्षण

संपादन

वसाहतीत दहावीपर्यंतचे शिक्षण देणारे दोन माध्यमिक शाळा आहेत. विद्या मंदिर माध्यमिक शाळा ही एक मराठी माध्यमिक शाळा आहे तर विद्या निकेतन ही इंग्रजी माध्यमाची शाळा आहे जी इयत्ता १२ वी पर्यंत शिक्षण प्रदान करते.

आरोग्य सेवा

संपादन

कॉलनीत एक सरकारी रुग्णालय आहे.

अर्थव्यवस्था

संपादन

वसाहतीत दोन बाजारपेठा कार्यरत आहेत.

वसाहतीत हनुमान मंदिर आहे. खुले रंगमंच येथे कॉलनीतील लोक गणेशोत्सव आणि दुर्गापूजन अशा विविध सण साजरे करतात.

संदर्भ

संपादन