उ गो मोहीम
उ गो मोहीम किंवा ऑपरेशन सी (जपानी: ウ号作戦) ही दुसऱ्या महायुद्धादरम्यान जपानी सैन्याने आखलेली मोहीम होती.
या मोहीमेनुसार जपानी सैन्याने म्यानमार (तेव्हाचे ब्रह्मदेश) मधून ईशान्य भारतातील ब्रिटिश ठाण्यांवर चाल केली. तेथून पुढे नागालॅंड व मणिपूर प्रदेशांतून वायव्येस कूच करीत ब्रह्मपुत्रेचे खोरे काबीज करण्याचा बेत होता. यात आझाद हिंद फौजेने जपानी सैन्याची साथ दिली होती. मार्च-जून १९४४ च्या दरम्यान केल्या गेलेल्या या मोहीमेचे पर्यवसान इम्फाल व कोहिमाच्या लढायांमध्ये झाले. या दोन्ही ठिकाणी ब्रिटिश भारतीय सैन्याने जपानी सेना व आझाद हिंद फौजेचा सडकून पराभव केला व त्यांना भारतातून माघार घेण्यास भाग पाडले. येथे पराभव झाल्यावर जपानी सैन्याने भारताचा व पर्यायाने ब्रिटिशांचा नाद सोडला व स्वबचावाची तयारी सुरू केली. या लढायांची तुलना अनेकदा स्टालिनग्राडच्या वेढ्याशी केली जाते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |