उबाळी हे महाराष्ट्राच्या नागपूर जिल्ह्याच्या कळमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. हे गाव नागपूरपासून पश्चिमेस सुमारे ३१ किमी लांब आहे. हे गाव नागपूर- कळमेश्वर-मोहपा रस्त्यावर आहे.

  ?उबाळी

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर नागपूर
जिल्हा नागपूर
भाषा मराठी
कोड
पिन कोड
आरटीओ कोड

• 441501
• MH

या गावाजवळ सुमारे ६७ प्राचीन अश्मवर्तुळे सापडली आहेत.[] अश्मवर्तुळे ही एक प्रकारची थडगी असतात. त्या थडग्यांसभोवताल दगड गोलाकार रचून वर्तुळे करण्यात येतात. त्यांना अश्मवर्तुळे म्हणतात.ही पद्धत भारतात प्राचीन काळी अस्तित्वात होती.[ संदर्भ हवा ]

रातुम नागपूर विद्यापीठाच्या इतिहास,संस्कृती व पुरातत्त्व विभागातर्फे या ठिकाणी असलेल्या सपाट टेकडीवर हे उत्खनन सुरू आहे. येथे मानवी हाडांसमवेतच घोड्याचा एक सांगाडाही सापडला आहे. पुरातत्त्वदृष्टीने हे महत्त्वाचे स्थान आहे.[]

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ a b तरुण भारत, नागपूर- ई-पेपर,आपलं नागपूर पुरवणी, पान क्र. ११ विदर्भात वैदिक काळातील थडग्यांचा शोध Check |दुवा= value (सहाय्य). दि. १० मार्च २०१७ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: extra punctuation (link)