बुद्धांनी शिकवले की उपोसथ दिवस म्हणजे “अशुद्ध मनाची शुद्धता” करण्याचा दिवस होय,उपोसथ किंवा उपोस्थ या शब्दाचा अर्थ उप+स्था म्हणजे एकत्र बसने होय, भिक्षुसंघाची एकसंधपणा टिकवून राहण्यासाठी उपोसथ विधी खूप महत्त्वाचा मानला गेला.उपोसथ विधी बुद्ध काळापासून अस्तित्वात (६०० ई.पू.) आहे आणि बौद्ध देशांमध्ये उपोसथ विधी श्रद्धापूर्वक पाळला जातो.

उपोसथ
उपोसथ

अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी भिक्खू पटिमोक्खा (आचारसंहितेचे नियम) यांचे पाक्षिक दोषस्वीकारणा आणि पाठ होते. या दिवशी बौद्ध उपासक आणि भन्ते धम्म अध्ययन आणि ध्यानाचे तीव्रत्व आणखी वाढवतात. बुद्धाच्या काळी अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी भिक्खू पटिमोक्खा (आचारसंहितेचे नियम) यांचे पाक्षिक दोषस्वीकारणा आणि पाठ होत असते. विनयासंबधी जर आचारात काही दोष आला असेल तर उपोसथ दिवशी भन्ते सर्वांसमोर दोषस्वीकारणा देत असत व संघ नियमानुसार त्यांना पुढील कार्यवाहीला समोर जावे लागते. ही विधी अतिशय पवित्र मानला जायची जी आजही पाळली जाते.

धम्माप्रती बांधिलकी उपासक गृहस्थ अष्टांगिक मार्गाचे पालन करतात. धम्मा आचरणात उत्साह जागृत होण्याकरिता समाधी मार्गाचे ध्यानाचे अवलंबन करतात.जेव्हा शक्य असेल तेव्हा उपासक या दिवसाचा उपयोग स्थानिक विहारात जाण्याची संधी म्हणून करतात. या दिवशी संघाला विशेष दान अर्पण केले जाते, धम्म प्रवचन ऐकले जाते आणि रात्री उशिरापर्यंत धम्म बांधवासोबत ध्यानधारणा केली जाते. जे उपासक विहारात जाऊ शकत नाहीत अशांना आपली ध्यान करण्याचे प्रयन्त वाढवण्याची संधी उपोसथ दिवस देतो कारण या पवित्र दिवशी जगातील हजारो उपासक ध्यानधारणेचा अभ्यासात वाढ होण्याच्या दिशेने पाऊल टाकतात.

वर्षावास म्हणजे पावसाळ्यातील तीन महिने अर्थात आश्विन पौर्णिमेपर्यंत निमंत्रित बुद्ध विहारात व्यतीत करणे. या काळात भिक्खू विनयात कमीपणा आला असेल त्यांनी ज्येष्ठ भिक्खुंद्वारा पूर्तता करणे, ध्यान - साधना करणे, बौद्ध उपासक / उपासिकांना धम्म शिकविणे, उपासकांकडून अष्ट पुरस्कारांचे धम्मदान स्वीकारणे व उर्वरित नऊ महिने धम्म - प्रचार - प्रसाराला घालविणे हे भिक्खुंचे कार्य असते.

तथागतांनी बुद्धत्व प्राप्तीनंतर पंचवर्गीय संन्याशांना आपला अष्टांगिक मार्ग, प्रतीत्य समुत्पाद, चार आर्यसत्य हे समजावून दिल्यानंतर त्यांना ते कळले. इसिपतन वन (आधुनिक सारनाथ), वाराणसी येथे अनुत्तर असे पहिले धम्मचक्र प्रवर्तन केले. आश्विन पौर्णिमेला एकसष्ठ अर्हत भिक्षुंच्या समवेत धम्मचक्राची घोषणा केली. चारही दिशांना जाऊन माझ्या बहुजन हिताय - बहुजन सुखाय धम्मची अशी सिंहगर्जना केली. जेव्हापासून तथागतांनी आषाढी पौर्णिमेला भिक्षु समवेत प्रथम वर्षावास इसिपतन मध्ये केला, तेव्हापासून भिक्खू वर्षावास प्रारंभ करतात. वर्षावास

 
वर्षावास

तथागत बुद्धाच्या काळात बुद्धांनी सर्व भिक्षूंना धम्माचा प्रसार करण्याचे आदेश दिले आणि सर्व बौद्ध भिख्खू या कामात गुंतले होते, परंतु असे केल्याने त्यांना बऱ्याच संकटांना आणि विशेषतः पावसाळ्यात नद्यांमध्ये अनेक संकटांना सामोरे जावे लागत होते. पुरामुळे बौद्ध भिक्खू वाहून जायचे आणि त्यांच्या चालण्याने शेतातील पिकांचे नुकसान होत असायचे त्यांनी हे तथागतांना सांगितले, बुद्धांनी आदेश दिला की आषाढ पौर्णिमेपासून ते अश्विनी पौर्णिमेपर्यंत सर्व भिक्षूंनी एकाच ठिकाणी राहावे, भिक्षेसाठी गावात जाऊ नये. ऐकाच ठिकाणी राहून धम्माचे वाचन व अभ्यास करावा. जर आवश्यकता पडली तर भिक्षू आपल्या गुरूंकडून जास्तीत जास्त एका आठवड्याचा वेळ घेऊन विहारातून बाहेर जाऊ शकतात, तथागत बुद्ध काळापासून वर्षावास अस्तित्वात आहे. भगवान बुद्धांनी पहिला वर्षावास इ.स.पू. ५२७ मध्ये सारनाथच्या इसिपटन मध्ये केला आणि त्यानंतर ४५ वर्षावास त्यांनी श्रावस्ती, जेतावन, वैशाली, राजगृह इत्यादी ठिकाणी केले. अशा प्राचीन गुरू शिष्य परंपरेचे पालन आजही भारतात आणि बौद्धराष्ट्र थायलंड, म्यानमार, श्रीलंका कंबोडिया आणि बांगलादेश पालन करतात.

अनु. क्र धर्म       उपास पर्व   कालावधी तत्त्व
हिंदू श्रावण श्रावण महिना हा हिंदू कॅलेंडर नुसार ५ वा महिना आहे. श्रावण महिना हा २३ जुले ते २२ ऑगस्ट या तारखांदरम्यान असतो. देवाची पूजा आणि उपास
मुस्लिम रमजान ईद रमजान ईद इस्लामिक कॅलेंडरचा नववा महिना आहे.पूर्ण १ महिना रमजान ईद पाळली जाते. उपास आणि विशेष करून प्रार्थना (नमाज) वर भर दिला जातो. गरिबांना मदत करण्यास सांगतले आहे
क्रिशन लेन्ट ईस्टर सणाच्या ४० दिवस अगोदरचा उपास, राख बुधवारीपासून सुरू होते आणि साधारण सहा आठवड्यांनंतर, ईस्टर रविवारच्या आधी संपतो.   उपास आणि यशुच्या त्यागाचे स्मरण केले जाते

व वर्षभर केलेल्या चुकांची क्षमा मागितली जाते

जैन पर्युषण भाद्रपद महिन्याच्या पंचम तिथीला सुरू होऊन हा उत्सव अनंत चतुर्दशी पर्यंत साजरा केला जातो. जैन धर्माचे तत्त्व अहिंसा हा उपासाचा मध्य असतो.

पर्युषण सणाच्या वेळी सर्व भाविक धार्मिक ग्रंथांचे पठण करतात. आणि त्याशी संबंधित प्रवचने ऐकतात. अनेक भाविक उत्सवाच्या वेळी उपास करतात. या सणात दान करणे हा सर्वांत श्रेष्ठ पुण्य मानला जातो. पर्युषण उत्सवात रथयात्रा किंवा मिरवणूक काढली जाते. अनेक ठिकाणी सामुदायिक मेजवानी आयोजित केल्या जातात.

यहूदी (ज्यू) प्रायश्चित्त दिवस (योम खिपूर ) २५ तासाचा कालावधी असतो पूर्ण वेळ देवाची आराधना करण्यात प्रायश्चित करण्यात तसेच २५ तासाचा

कठोर उपास करण्यात घालवतात