उद्योगीकरणाचे फायदे आणि तोटे

अठराव्या शतकात युरोपमध्ये इंग्लंड देशात औद्योगिक क्रांती झाली.प्राणी आणि मनुष्य शक्तीच्या ऐवजी यंत्रांचा वापर करून उत्पादनात वाढ करण्याचा गरजेतून विविध यंत्रांचा शोध लागला. 'गरज ही शोधाची जननी असते' असे म्हणतात. या गरजांमधून विविध प्रकारच्या उद्योगांचा विकास झाला. कापड उद्योग, लोह्पोलाद उद्योग, साखर उद्योग, सिमेंट उद्योग अशा प्रकारच्या मोठ्या उद्योगाबरोबर लघुउद्योगही मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढीस अग्रेसर आहेत. लघु उद्योग असो, कुटिरोद्योग असो वा मोठा उद्योग. या कोणत्याही उद्योगात दोन घटक महत्त्वाचे असतात. एक म्हणजे भांडवलदार आणि दुसरा कामगार. भांडवलदार उत्पादनात वाढ करण्यासाठी कुशल कामगाराची नेमणूक करतात, त्यासाठी शासन आणि त्यांचे भांडवलासंबंधी असलेले नियोजन त्यांच्या सहाय्याने उद्योगात प्रगती करत आहेत.