हरिभक्तपरायण उद्धवबुवा घनश्याम जावडेकर हे ३५ वर्षांहून अधिक वर्षे भारतभर कीर्तने करीत आहेत. ते मुळचे सांखळी-गोवा येथील रहिवासी असून पुण्यात स्थायिक झालेले आहेत. राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. उद्धवबुवा जावडेकर यांनी गोवा, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, आंध्रप्रदेश आणि कर्नाटक इत्यादी राज्यांत जाऊन ६५००पेक्षाही जास्त कीर्तने केली आहेत.

कीर्तनाचे धडे संपादन

उद्धवबुवा जावडेकर यांनी गोविंदस्वामी आफळे व गं. ना. कोपरकर या सारख्या राष्ट्रीय कीर्तनकारांकडून कीर्तनाचे शिक्षण घेतले व त्यानंतर स्वतंत्रपणे त्यांनी नारदीय कीर्तन परंपरेद्वारे सेवा बजावली.

अभ्यासपूर्ण व खणखणीत आवाजात कीर्तन सादर करणारे उद्धवबुवा जावडेकर हे कला अकादमीचे पहिले कीर्तन प्रशिक्षण विद्यार्थी ठरले होते. कीर्तन परंपरेमध्ये नव्याने अनेक बदल घडवून त्यात नावीन्यता आणण्याचा प्रयत्‍नही त्यांनी केलेला आहे.

जावडेकरांना मिळालेले पुरस्कार संपादन

  • मुंबईचा एक प्रतिष्ठेचा पुरस्कार (नाव?)
  • कीर्तन संजीवनी पुष्पलता रानडे विशेष गौरव पुरस्कार (२०१५)