महानुभावांच्या साती ग्रंथांपैकी एक. कर्ता भास्करभट्ट बोरीकर. भागवताच्या एकादशस्कंधावरील मराठीतील ही पहिली टीका ठरते. मूळ स्रोतातील १३६७ श्लोकांचा संक्षेप ८२७ ओव्यांमध्ये भास्कराने केला आहे. श्रीकृष्ण-उद्धव संवाद असा या पद्याचा स्वरूपविशेष आहे. श्रीकृष्णाने उद्धवाला वैराग्यज्ञानभक्ती यांचे रहस्य सांगितले आहे त्याचे निरुपण करण्यासाठी हा ग्रंथ रचला गेला आहे. उद्धव-श्रीकृष्ण भक्ती, विरह याची उत्कट प्रतीती यात येते. शिशुपाळवध या पद्यात शृंगाराचे मेळे जमविणारा कवीच इथे शांतरस आणतो.

उद्धवगीता
लेखक भास्करभट्ट बोरीकर
भाषा मराठी
देश भारत
साहित्य प्रकार ग्रंथ