उत्पादन अभियांत्रिकी

उत्पादन अभियांत्रिकी ही शाखा उत्पादन तंत्रज्ञान, अभियांत्रिकी विज्ञानव्यवस्थापन विज्ञान या तिहींचे मिश्रण आहे. उत्पादन अभियंत्याला अभियांत्रिकी पद्धतींचे सर्वकष ज्ञान असते तसेच उत्पादनासंबंधी आव्हानेदेखील त्याला योग्य रितीने अवगत असतात. त्याचे ध्येय हे उत्पादन प्रणालीला त्रासदायक न ठरता, योग्य न्यायाने व तारतम्य वापरून व आर्थिकदृष्ट्या परवडेल अश्या तऱ्हेने उत्पादन करणे असे असते.