उगादी
उगादी (तेलुगु: ఉగాది (उगादि), कन्नड: ಯುಗಾದಿ (युगादि)) हा आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगाण राज्यात साजरा होणारा नववर्ष सण आहे.[१] हिंदू चांद्र कालगणनेशी संबंधित हा सण सामान्यतः मार्च किंवा एप्रिल महिन्यात येतो.[२] महाराष्ट्रात या सणाला गुढीपाडवा म्हणतात.
प्राचीनता
संपादनमध्ययुगीन ग्रंथांमधे या सणाचे उल्लेख सापडतात. या दिवशी मंदिरांना देणगी देण्याचे किंवा सामाजिक उपक्रमांना दान देण्याचे संदर्भ सापडतात.[३]
शब्दाचा अर्थ
संपादनउगादी या शद्बात युग असा शब्द आहे. युग म्हणजे नवे युग किंवा शक किंवा कालखंड.[४] नव्या वर्षाची सुरुवात असा याचा अर्थ आहे.[५]
उत्सवाचे स्वरूप
संपादनआठवडाभर आधी या सणाची पूर्वतयारी सुरू होते. घराची आणि अंगणाची स्वच्छता केली जाते.नववर्ष स्वागतासाठी दरवाजावर तोरण बांधतात. दारापुढे रांगोळी काढतात.सृष्टी निर्माण करणाऱ्या ब्रह्मदेवाची या दिवशी विशेष पूजा केली जाते.नवीन कपड्यांची खरेदी, भेटवस्तूंची देवाणघेवाण करतात.[६] सकाळी अभ्यंगस्नान करतात. गरीबांना दान देतात..स्वयंपाकात पचडी (कोशिंबीर) करतात. काहीजण मंदिरात जाऊन देवदर्शन घेतात. पचडी या पदार्थात गोड, आंबट, तिखट अशा सर्व चवींचे एकत्रित मिश्रण असते. चिंच, कडुनिंबाची पाने, गूळ, मीठ, कैरी घालून हा पदार्थ तयार केला जातो.[७] येणाऱ्याया कडू गोड आठवणींचे स्मरण रहावे ही यामागील प्रतिकात्मकता आहे असे मानले जाते.[१] कर्नाटकात नवीन वर्षाचे पंचांगश्रवण करण्याची पद्धती आहे.
शुभेच्छा
संपादनयुगादी हब्बडा शुभाष्यगलु(ಯುಗಾದಿ ಹಬ್ಬದ ಶುಭಾಶಯಗಳು)होस वर्षदा शुभाष्यगलु( ಹೊಸ ವರ್ಷದ ಶುಭಾಶಯಗಳು) अशा कर्नाटकात शुभेच्छा देतात. तेलग मधे नूतन संवत्सर शुभाकांक्षलु (నూతన సంవత్సర శుభాకాంక్షలు)अशा शुभेच्छा देतात. [ संदर्भ हवा ]
विशेष पदार्थ
संपादनया सणाच्या निमित्ताने आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधे भक्षालू पुरणपोळीसारखा पदार्थ करतात. तो तुपाबरोबर खातात.[८] कर्नाटकात बोब्बाटू नावाचा विशेष पदार्थ करतात. पुरणपोळीशी साम्य असणारा हा पदार्थ दूध,तूप किंवा नारळाच्या दुधासह खातात.[६]
हे सुद्धा पहा
संपादनसंदर्भ
संपादन- ^ a b Gupta, C. Dwarakanath (1999). Socio-cultural History of an Indian Caste (इंग्रजी भाषेत). Mittal Publications. ISBN 9788170997269.
- ^ Dalal, Roshen (2010). Hinduism: An Alphabetical Guide (इंग्रजी भाषेत). Penguin Books India. ISBN 978-0-14-341421-6.
- ^ Raman, K. V. (2003-06). Sri Varadarajaswami Temple, Kanchi: A Study of Its History, Art and Architecture (इंग्रजी भाषेत). Abhinav Publications. ISBN 9788170170266.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "युग - Wiktionary". en.m.wiktionary.org. 2019-03-15 रोजी पाहिले.
- ^ Hinduism (इंग्रजी भाषेत). PediaPress.
- ^ a b Singh, Rupa (2022-03-23). "Ugadi Festival 2022: कभी न पूजे जाने वाले ब्रह्मा जी की क्यों होती है इस दिन पूजा, जानें यहां". https://hindi.boldsky.com (हिंदी भाषेत). 2022-03-24 रोजी पाहिले. External link in
|website=
(सहाय्य) - ^ Gajrani, S. (2004). History, Religion and Culture of India (इंग्रजी भाषेत). Gyan Publishing House. ISBN 9788182050617.
- ^ Bilkees, Latif (2000-10-14). Essential Andhra Cookbook (इंग्रजी भाषेत). Penguin UK. ISBN 9788184754339.