उकुली (केरळमधील होळी)
उकुली हा भारत देशाच्या केरळ राज्यातील होळीचा सण आहे. याला मंजल कुली असेही एक नाव आहे. केरळ राज्यातील कोंकणी आणि कुदुम्बी समाजगटामध्ये या उत्सवाचे विशेष महत्त्व मानले जाते.[१] हळदीचा वापर करून या सणाचा आनंद घेतला जातो.[२]
स्वरूप
संपादनगोश्रीपूरम थीरुमा कोकणी मंदिरात होळीचा उत्सव साजरा केला जातो. पोर्तुगीज राजवटीच्या काळात गोवा राज्यातून केरळ राज्यात स्थलांतर केलेले नागरिक कुदुम्बी नावाने ओळखले जातात. ते हा उत्सव चार दिवस साजरा करतात. सुपारीचे झाड कापून ते मंदिरात आणले जाते आणि त्याची पूजा केली जाते. तसेच गोवा राज्यातून केरळ मध्ये स्थलांतर करताना मगरीने या नागरिकांना मदत केली अशे त्यांची धारणा असल्याने मातीचे मगर तयार केली जाते आणि मंदिरात तिची पूजा केली जाते. उत्सवाच्या शेवटच्या दिवशी रंग खेळला जातो.[३]
संदर्भ
संपादन- ^ "कुठे धुळवड तर कुठे उक्कुली.! वेगवेगळ्या राज्यांतील होळी साजरी करण्याच्या पद्धती". News18 Lokmat. 2021-03-27. 2022-03-14 रोजी पाहिले.
- ^ "Different types of Holi celebrations in India". WION (इंग्रजी भाषेत). 2022-03-14 रोजी पाहिले.
- ^ "Holi in Kerala – Holi Festival in Kerala, Holi Celebration in Kerala". www.holifestival.org. 2022-03-18 रोजी पाहिले.