उंट अळी
या अळीस उंटासारखे कुबड असते व ती पोक काढुन चालते म्हणून या अळीस उंट अळी म्हणतात.(इंग्रजी:एकिआ जॅनेटा (कुल-नॉक्ट्युइडी, गण लेपिडॉप्टेरा) हा एक प्रकारचा पतंगसदृष्य किट आहे.प्रादुर्भाव झालेल्या पिकाच्या पानाच्या मागील बाजूस याची मादी अंडी घालते.एक आठवड्यात ती अंडी उबून त्यातून बाहेर पडलेल्या अळ्या पंधरवाड्यात पूर्णपणे वाढतात व आपले काम सुरू करतात. त्या पानाच्या फ्क्त शीराच ठेवून बाकी सर्व भाग खाउन टाकतात.त्यामुळे पिकाची पाने नष्ट झाल्यामुळे त्याची वाढ होत नाही.[१]
संदर्भ
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |