ई लर्निंगचे फायदे व तोटे
ई लर्निंगचे फायदे व तोटे
संपादनमागील लेखात, आपण शिक्षण प्रक्रिया, शिक्षण चक्र, शिक्षण प्रक्रियेतील ५ मुख्य टप्पे, आनंददायी सहज शिक्षण, चिकित्सक प्रतिसादाचा वेळ, समकालिक आणि असमकालिक शैक्षणिक कृती ह्या सारख्या महत्त्वाच्या संकल्पनांची ओळख करून घेतली. तंत्रज्ञानावर आधारित शिक्षणप्रणालीच्या “दूरस्थ वर्ग” व “शिकण्यास पोषक पर्यावरण निर्मिती” पद्धतीची आणि त्याच्या महत्त्वाच्या वैशिष्ट्यांची पण आपण ओळख करून घेतली. ह्या लेखात, ई लर्निंगचे पद्धतीचे फायदे, तोटे आणि त्याच्या यशस्वी उदाहरणांची आपण ओळख करून घेणार आहोत.
== स्थळ काळाची लवचिकता ==
पारंपारिक शिक्षणव्यवस्थेत, शिक्षक शिकवीत असलेल्या स्थळी आणि वेळीच, विद्यार्थ्याने उपस्थित असणे आवश्यक असते. कुठल्याही कारणामुळे, जर विद्यार्थी त्याच स्थळी आणि वेळी उपस्थित राहू शकत नसेल, तर तो शिक्षण घेऊ शकत नाही. उपस्थित विद्यार्थ्याची सुद्धा त्या वेळी शिक्षण घेण्यास पोषक मानसिकता नसेल, तरीदेखील तो शिक्षण घेण्यास मुकतो. ई लर्निंग मुळे स्थळ काळाची ही बंधने गळून पडतात. ई लर्निंग मुळे प्रत्येक विद्यार्थी, त्याला सोयीच्या असलेल्या स्थळी आणि वेळी, शिकू शकतो. आतापर्यंत शिकू शकत नसलेल्या खूप मोठ्या विद्यार्थी संख्येस शिक्षणव्यवस्थेत आणण्यास ही “स्थळ काळाची लवचिकता” आवश्यक व सक्षम आहे. साहजिकच, “ई लर्निंग” मुळे शिक्षणाची उपलब्धता भरपूर वाढते.
== माध्यमाची लवचिकता ==
ई लर्निंग, समकालिक (Synchronous) आणि असमकालिक (Asynchronous) माध्यमाचा परिणामकारक वापर करते. ह्यामुळे विद्यार्थी, प्रत्येक माध्यमाच्या हितकारक वैशिष्ट्यांचा लाभ घेऊ शकतो आणि त्याच सोबत अहितकारक वैशिष्ट्यांचा प्रभाव पण भरपूर कमी होतो. विशेषतः असमकालिक माध्यमाच्या परिणामकारक वापरामुळे, चिकित्सक प्रतिसादाकरीता आवश्यक असलेला कमीतकमी वेळ उपलब्ध होत असल्याने, कमी किंवा उच्च क्षमतेचा प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक शैक्षणिक कृतीत, उपयुक्त आणि अर्थपूर्ण सहभाग घेऊ शकतो. ई लर्निंग मुळे, उच्च क्षमतेच्या विद्यार्थ्यास आवश्यक असणारी आव्हाने आणि त्याच सोबत, कमी क्षमतेच्या विद्यार्थ्यास आवश्यक असणारा जास्त वेळ, दोन्ही एकाच वेळी देणे शक्य होते. ह्यामुळे शिक्षणाची गुणवत्ता तर वाढतेच व शिक्षण आनंददायी आणि सहज देखील होते. ई लर्निंग मुळे, साहजिकच सर्व विद्यार्थ्यास सहज मानवणारी शिक्षणव्यवस्था निर्माण करणे शक्य होते.
== कमी किंमतीत जास्त उपलब्धता ==
“शिकण्यास पोषक पर्यावरण निर्मिती” या पद्धतीमुळे शिक्षणाची तीच उच्च गुणवत्ता, कमीत कमी किंमतीत, जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोहोचते. ई लर्निंग मुळे,
- स्थळ काळाची बंधने पाळणे शक्य नसणारा विद्यार्थी देखील शिक्षणव्यवस्थेत येऊ शकतो.
- कमी आणि उच्च क्षमतेच्या विद्यार्थ्यास मानवणारी शिक्षणव्यवस्था निर्माण करता येते.
साहजिकच, “ई लर्निंग” कमीत कमी किंमतीत उच्च गुणवत्तापूर्ण शिक्षण जास्तीत जास्त उपलब्धतेसह देण्यास सक्षम ठरते.
== उच्च गुणवत्ता ==
एकाच सत्रात, वेगवेगळ्या वर्गात, एकच विषय, एकच शिक्षक जरी शिकवीत असला तरी प्रत्येक वर्गातील प्रत्येक व्याख्यानाची गुणवत्ता निश्चितपणे वेगवेगळी असते. ही गुणवत्ता प्रत्यक्ष व्याख्यानाच्या वेळी असलेल्या शिक्षकाच्या आसपासच्या वेगवेगळ्या भौगोलिक व मानवी परिस्थितीवर अवलंबून असते.जसे
- उत्सवाच्या काळात, आसपासच्या अतिध्वनी प्रदुषणामुळे व्याख्यानाची गुणवत्ता कमी होते.
- संध्याकाळी नियोजित व्याख्यानाची गुणवत्ता शिक्षक किंवा विद्यार्थी ह्यांना आलेल्या थकव्यामुळे कमी होते.
- एखाद्या व्याख्यानाची गुणवत्ता, केवळ शिक्षक किंवा विद्यार्थी ह्यांचा “Mood” नसल्यामुळे देखील कमी होते.
“ई लर्निंग” मुळे मात्र, प्रयत्नपूर्वक आणि व्यवस्थित नियोजनानंतर “Master Teacher” ने दिलेल्या व्याख्यानाच्या प्रथम प्रतीच्या निर्माणानंतर, तीच उच्च गुणवत्ता सर्व सत्रात, सर्व वर्गातील प्रत्येक व्याख्यानाच्या वेळी निश्चितपणे देणे सहज शक्य आहे.
आनंददायी आणि सहज शिक्षणाकरीता प्रत्येक विद्यार्थी वेगवेगळ्या पद्धती वापरणे पसंत करतो. जसे
* काही विद्यार्थी दृकश्राव्य माध्यमाचा वापर करून दिलेले व्याख्यान पसंत करतात.
- काही विद्यार्थी छापील पुस्तकाचे स्वयं अध्ययन करून स्वतःच शिकणे पसंत करतात.
- काही विद्यार्थ्यांना शिक्षकाची खूप जास्त मदत अपेक्षित असते.
- काही विद्यार्थ्यांना त्यांना आवश्यक वाटेल तिथेच आणि हवी असेल तेवढीच शिक्षकाची मदत अपेक्षित असते.
पारंपारिक शिक्षणव्यवस्थेत शिक्षक-केंद्री पद्धती मुळे सहसा प्रत्येक विद्यार्थ्यास शिकण्याकरीता वेगवेगळ्या पद्धती वापरण्याची मुभा नसते. “ई लर्निंग” पद्धती मात्र निसर्गत: विद्यार्थी-केंद्री असल्यामुळे, विद्यार्थी त्याला आवडेल ती पद्धत निवडून वापरू शकतो. पारंपारिक शिक्षणव्यवस्थेत, नियोजित वेळेत अभ्यासक्रम शिकवून पूर्ण करणे ही शिक्षकाची जबाबदारी असल्यामुळे, Interaction, Evaluation and Feedback ह्या सारख्या महत्त्वाच्या शैक्षणिक कृतींवर शिक्षक सहसा फक्त ५ ते १० टक्के वेळ देतात. ह्याचमुळे “प्रयत्नपूर्वक व शोधक वर्तनामुळे शिकणे” (Exploratory Learning) ही पद्धत देखील वेळेच्या अभावामुळे पारंपारिक शिक्षणव्यवस्थेत फारच कमी वापरता येते. ह्या कारणाने साहजिकच पारंपारिक शिक्षणव्यवस्थेतील शिक्षण प्रक्रिया विद्यार्थ्यासाठी कंटाळवाणी होते.
“ई लर्निंग” पद्धतीत मात्र Evaluation and Feedback ह्या सारख्या महत्त्वाच्या शैक्षणिक कृती संगणकाच्या साह्याने, “शिक्षकाच्या प्रत्येक कृतीमध्ये प्रत्यक्ष सहभागा शिवाय” (like Formative Feedback with Online Self-Test) वारंवार करणे सहज शक्य आहे. “ई लर्निंग” पद्धतीत वरील शैक्षणिक कृतींवर वर ४०-५० टक्के वेळ देऊन सुद्धा शिक्षकावर कुठलाही कार्यभार वाढत नाही. “ई लर्निंग” मध्ये “Exploratory Learning” पद्धतीचा प्रामुख्याने वापर होत असल्याने शिक्षण प्रक्रिया विद्यार्थ्यासाठी आनंददायी व सहज होते. आनंददायी सहज शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची अभ्यासात रुची वाढते. == पुनःवापर (REUSABILITY) ==
पारंपारिक शिक्षणव्यवस्थेत प्रत्येक व्याख्यानाचे अस्तित्त्व फक्त त्याच वेळी आणि त्याच वर्गात असते. व्याख्यानाच्या वेळे आधी किंवा नंतर, अथवा इतर वर्गात, विद्यार्थी त्याच व्याख्यानाचा अनुभव परत घेऊ शकत नाही. प्रत्येक व्याख्यान ही स्वतंत्र आणि नवीन शैक्षणिक कृती असते. “Interactive” शैक्षणिक कृतीसाठी मानवी शिक्षक हा नेहमीच अत्यावश्यक असतो. “ई लर्निंग” पद्धतीत मात्र, प्रयत्नपूर्वक आणि व्यवस्थित नियोजनानंतर “Master Teacher” ने दिलेल्या व्याख्यानाच्या प्रथम प्रतीच्या निर्माणानंतर, वेगवेगळ्या सत्रात आणि वर्गात, त्याच उच्च गुणवत्तेच्या त्याच व्याख्यानाचा वारंवार वापर करता येतो. कालांतराने “ई लर्निंग” मुळे प्रत्येक सत्रात आणि वर्गात, नवीन व्याख्यान देण्याचा शिक्षकावरील कार्यभार कमी होत जातो. साहजिकच, ह्यामुळे, शिक्षक “Interaction” वर जास्त वेळ देऊन “मानवी शिक्षकाच्या ह्या अत्यावश्यक कर्तव्याला” न्याय देऊ शकतात
== ई लर्निंगचे फायदे ==
जगातील संशोधनाचे निष्कर्ष खालील ई लर्निंगचे फायदे दर्शवितात:
- तात्काळ उपलब्धता: ई लर्निंग पद्धतीत, शैक्षणिक साहित्य प्रकाशित केल्यानंतर, लगेच जगातील सर्व विद्यार्थी त्याचा वापर सुरू करू शकतात.
- तिप्पट कार्यक्षमता: ई लर्निंग पद्धतीत, विद्यार्थी तिप्पट वेगाने शिकतात किंवा तेवढयाच वेळेत, तिप्पट जास्त शिकतात.
- कुठेही आणि केव्हाही: ई लर्निंग पद्धतीत, जगातील सर्व विद्यार्थी कुठूनही आणि केव्हाही शिकू शकतात.
- अनुरूप बदल करण्याची क्षमता: विद्यार्थ्यांच्या आवडी निवडी किंवा पूर्व क्षमते नुसार शिक्षण साहित्याच्या सादरीकरणात अनुरूप बदल करण्याची क्षमता ई लर्निंग पद्धतीत असते
माध्यमाची लवचिकता
संपादनई लर्निंग, समकालिक (Synchronous) आणि असमकालिक (Asynchronous) माध्यमाचा परिणामकारक वापर करते. ह्यामुळे विद्यार्थी, प्रत्येक माध्यमाच्या हितकारक वैशिष्ट्यांचा लाभ घेऊ शकतो आणि त्याच सोबत अहितकारक वैशिष्ट्यांचा प्रभाव पण भरपूर कमी होतो. विशेषतः असमकालिक माध्यमाच्या परिणामकारक वापरामुळे, चिकित्सक प्रतिसादाकरीता आवश्यक असलेला कमीतकमी वेळ उपलब्ध होत असल्याने, कमी किंवा उच्च क्षमतेचा प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक शैक्षणिक कृतीत, उपयुक्त आणि अर्थपूर्ण सहभाग घेऊ शकतो. ई लर्निंग मुळे, उच्च क्षमतेच्या विद्यार्थ्यास आवश्यक असणारी आव्हाने आणि त्याच सोबत, कमी क्षमतेच्या विद्यार्थ्यास आवश्यक असणारा जास्त वेळ, दोन्ही एकाच वेळी देणे शक्य होते. ह्यामुळे शिक्षणाची गुणवत्ता तर वाढतेच व शिक्षण आनंददायी आणि सहज देखील होते. ई लर्निंग मुळे, साहजिकच सर्व विद्यार्थ्यास सहज मानवणारी शिक्षणव्यवस्था निर्माण करणे शक्य होते.
कमी किंमतीत जास्त उपलब्धता
संपादन“शिकण्यास पोषक पर्यावरण निर्मिती” या पद्धतीमुळे शिक्षणाची तीच उच्च गुणवत्ता, कमीत कमी किंमतीत, जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोहोचते. ई लर्निंग मुळे,
- स्थळ काळाची बंधने पाळणे शक्य नसणारा विद्यार्थी देखील शिक्षणव्यवस्थेत येऊ शकतो.
- कमी आणि उच्च क्षमतेच्या विद्यार्थ्यास मानवणारी शिक्षणव्यवस्था निर्माण करता येते.
साहजिकच, “ई लर्निंग” कमीत कमी किंमतीत उच्च गुणवत्तापूर्ण शिक्षण जास्तीत जास्त उपलब्धतेसह देण्यास सक्षम ठरते.
उच्च गुणवत्ता
संपादनएकाच सत्रात, वेगवेगळ्या वर्गात, एकच विषय, एकच शिक्षक जरी शिकवीत असला तरी प्रत्येक वर्गातील प्रत्येक व्याख्यानाची गुणवत्ता निश्चितपणे वेगवेगळी असते. ही गुणवत्ता प्रत्यक्ष व्याख्यानाच्या वेळी असलेल्या शिक्षकाच्या आसपासच्या वेगवेगळ्या भौगोलिक व मानवी परिस्थितीवर अवलंबून असते.जसे
- उत्सवाच्या काळात, आसपासच्या अतिध्वनी प्रदुषणामुळे व्याख्यानाची गुणवत्ता कमी होते.
- संध्याकाळी नियोजित व्याख्यानाची गुणवत्ता शिक्षक किंवा विद्यार्थी ह्यांना आलेल्या थकव्यामुळे कमी होते.
- एखाद्या व्याख्यानाची गुणवत्ता, केवळ शिक्षक किंवा विद्यार्थी ह्यांचा “Mood” नसल्यामुळे देखील कमी होते.
“ई लर्निंग” मुळे मात्र, प्रयत्नपूर्वक आणि व्यवस्थित नियोजनानंतर “Master Teacher” ने दिलेल्या व्याख्यानाच्या प्रथम प्रतीच्या निर्माणानंतर, तीच उच्च गुणवत्ता सर्व सत्रात, सर्व वर्गातील प्रत्येक व्याख्यानाच्या वेळी निश्चितपणे देणे सहज शक्य आहे.
आनंददायी आणि सहज शिक्षणाकरीता प्रत्येक विद्यार्थी वेगवेगळ्या पद्धती वापरणे पसंत करतो. जसे
- काही विद्यार्थी दृकश्राव्य माध्यमाचा वापर करून दिलेले व्याख्यान पसंत करतात.
- काही विद्यार्थी छापील पुस्तकाचे स्वयं अध्ययन करून स्वतःच शिकणे पसंत करतात.
- काही विद्यार्थ्यांना शिक्षकाची खूप जास्त मदत अपेक्षित असते.
- काही विद्यार्थ्यांना त्यांना आवश्यक वाटेल तिथेच आणि हवी असेल तेवढीच शिक्षकाची मदत अपेक्षित असते.
पारंपारिक शिक्षणव्यवस्थेत शिक्षक-केंद्री पद्धती मुळे सहसा प्रत्येक विद्यार्थ्यास शिकण्याकरीता वेगवेगळ्या पद्धती वापरण्याची मुभा नसते. “ई लर्निंग” पद्धती मात्र निसर्गत: विद्यार्थी-केंद्री असल्यामुळे, विद्यार्थी त्याला आवडेल ती पद्धत निवडून वापरू शकतो.
पारंपारिक शिक्षणव्यवस्थेत, नियोजित वेळेत अभ्यासक्रम शिकवून पूर्ण करणे ही शिक्षकाची जबाबदारी असल्यामुळे, Interaction, Evaluation and Feedback ह्या सारख्या महत्त्वाच्या शैक्षणिक कृतींवर शिक्षक सहसा फक्त ५ ते १० टक्के वेळ देतात. ह्याचमुळे “प्रयत्नपूर्वक व शोधक वर्तनामुळे शिकणे” (Exploratory Learning) ही पद्धत देखील वेळेच्या अभावामुळे पारंपारिक शिक्षणव्यवस्थेत फारच कमी वापरता येते. ह्या कारणाने साहजिकच पारंपारिक शिक्षणव्यवस्थेतील शिक्षण प्रक्रिया विद्यार्थ्यासाठी कंटाळवाणी होते.
“ई लर्निंग” पद्धतीत मात्र Evaluation and Feedback ह्या सारख्या महत्त्वाच्या शैक्षणिक कृती संगणकाच्या साह्याने, “शिक्षकाच्या प्रत्येक कृतीमध्ये प्रत्यक्ष सहभागा शिवाय” (like Formative Feedback with Online Self-Test) वारंवार करणे सहज शक्य आहे. “ई लर्निंग” पद्धतीत वरील शैक्षणिक कृतींवर वर ४०-५० टक्के वेळ देऊन सुद्धा शिक्षकावर कुठलाही कार्यभार वाढत नाही. “ई लर्निंग” मध्ये “Exploratory Learning” पद्धतीचा प्रामुख्याने वापर होत असल्याने शिक्षण प्रक्रिया विद्यार्थ्यासाठी आनंददायी व सहज होते. आनंददायी सहज शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची अभ्यासात रुची वाढते.
पुनःवापर (REUSABILITY)
संपादनपारंपारिक शिक्षणव्यवस्थेत प्रत्येक व्याख्यानाचे अस्तित्त्व फक्त त्याच वेळी आणि त्याच वर्गात असते. व्याख्यानाच्या वेळे आधी किंवा नंतर, अथवा इतर वर्गात, विद्यार्थी त्याच व्याख्यानाचा अनुभव परत घेऊ शकत नाही. प्रत्येक व्याख्यान ही स्वतंत्र आणि नवीन शैक्षणिक कृती असते.
“Interactive” शैक्षणिक कृतीसाठी मानवी शिक्षक हा नेहमीच अत्यावश्यक असतो. “ई लर्निंग” पद्धतीत मात्र, प्रयत्नपूर्वक आणि व्यवस्थित नियोजनानंतर “Master Teacher” ने दिलेल्या व्याख्यानाच्या प्रथम प्रतीच्या निर्माणानंतर, वेगवेगळ्या सत्रात आणि वर्गात, त्याच उच्च गुणवत्तेच्या त्याच व्याख्यानाचा वारंवार वापर करता येतो. कालांतराने “ई लर्निंग” मुळे प्रत्येक सत्रात आणि वर्गात, नवीन व्याख्यान देण्याचा शिक्षकावरील कार्यभार कमी होत जातो. साहजिकच, ह्यामुळे, शिक्षक “Interaction” वर जास्त वेळ देऊन “मानवी शिक्षकाच्या ह्या अत्यावश्यक कर्तव्याला” न्याय देऊ शकतात.
ई लर्निंगचे फायदे
संपादनजगातील संशोधनाचे निष्कर्ष खालील ई लर्निंगचे फायदे दर्शवितात:
- तात्काळ उपलब्धता: ई लर्निंग पद्धतीत, शैक्षणिक साहित्य प्रकाशित केल्यानंतर, लगेच जगातील सर्व विद्यार्थी त्याचा वापर सुरू करू शकतात.
- तिप्पट कार्यक्षमता: ई लर्निंग पद्धतीत, विद्यार्थी तिप्पट वेगाने शिकतात किंवा तेवढयाच वेळेत, तिप्पट जास्त शिकतात.
- कुठेही आणि केव्हाही: ई लर्निंग पद्धतीत, जगातील सर्व विद्यार्थी कुठूनही आणि केव्हाही शिकू शकतात.
- अनुरूप बदल करण्याची क्षमता: विद्यार्थ्यांच्या आवडी निवडी किंवा पूर्व क्षमते नुसार शिक्षण साहित्याच्या सादरीकरणात अनुरूप बदल करण्याची क्षमता ई लर्निंग पद्धतीत असते.
ई लर्निंगचे तोटे
संपादनजगातील संशोधनाचे निष्कर्ष खालील ई लर्निंगचे तोटे दर्शवितात:
- विशेष क्षमतांची गरज (Special Skills): ई लर्निंग पद्धतीत शिकण्या करिता प्रत्येक विद्यार्थ्यास काही किमान विशेष क्षमतांची गरज असते. जसे, संकेतस्थळ बघता येणे.
- किंमत: ई लर्निंग पद्धतीत, शैक्षणिक संस्थेला किंवा शिक्षकास काही किमान भांडवलाची गुंतवणूक करणे आवश्यक असते. तसेच, प्रत्येक विद्यार्थ्यास देखील काही किमान भांडवलाची गुंतवणूक करणे आवश्यक असते.
- आधारभूत संरचनाची आवश्यकता (Infrastructure): ई लर्निंग पद्धतीत, काही आधारभूत संरचनाची आवश्यकता असते. जसे, विद्युत, संगणक, महाजाल, इत्यादी.
- एकीकरण (Integration): ई लर्निंग पद्धतीत, वेगवेगळ्या सेवांचे एकीकरण आवश्यक असते. जसे, संगणक, महाजाल, इत्यादी.
- सर्वोत्कृष्ट ई लर्निंग सॉफ्टवेयर उपलब्ध नाही : अजून पर्यंत शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या सर्व गरजांसाठी सर्वंकष सेवा देऊ शकेल असे सर्वोत्कृष्ट ई लर्निंग सॉफ्टवेयर उपलब्ध झालेले नाही.
यशस्वी उदाहरणे
संपादनई लर्निंगची काही यशस्वी उदाहरणे खालील प्रमाणे आहेत. ह्यातील काही यशस्वी उदाहरणांची जास्त माहिती आपण ह्या लेखमालेतील पुढील लेखांमध्ये घेणार आहोत.
- प्रचंड मुक्त Online वर्ग (Massive Open Online Class [MOOC]): गेल्या २-३ वर्षात प्रचंड लोकप्रिय झालेला नवविचार.
- मुक्त शिकण्याची संसाधने: शैक्षणिक साहित्य मुक्त असावे, त्याच्या वापरावर कुठलेही बंधन नसावे असे मानणारा नवविचार.
- nptel.iitm.ac.in Archived 2015-10-28 at the Wayback Machine.
- इतर शिकण्याची संसाधने: जगातील सर्व विषया वरील, वेगवेगळ्या शिक्षकांच्या व्हिडीओ व्याख्यानांचा सर्वात मोठा खजिना. Science / Maths वरील महत्त्वाच्या संकल्पनांचा स्वतः भाग बनून अनुभवत शिकता येईल असा simulationsचा खजिना.
- निःशुल्क शिक्षण व्यवस्थापन पद्धती (Learning Management Systems): ह्या निःशुल्क शिक्षण व्यवस्थापन पद्धती ई लर्निंग करीता कार्यक्षम संरचना देतात.
- wiziq.com Archived 2013-03-18 at the Wayback Machine. (Live Virtual Class)
- शिक्षका करीता निःशुल्क Online Class Hosting सेवा : प्रत्येक शिक्षकास “Online Class” निर्माणा करीता पूर्णपणे निःशुल्क सेवा येथे उपलब्ध आहे.
- virtualuniversity.in Archived 2021-05-03 at the Wayback Machine.
- swselearn.com Archived 2020-10-31 at the Wayback Machine.
- killedar.org Archived 2014-12-20 at the Wayback Machine.
ह्या लेखात, ई लर्निंगचे पद्धतीचे फायदे, तोटे आणि त्याच्या यशस्वी उदाहरणांची आपण ओळख करून घेतली आहे. ह्या लेखमालेतील पुढील लेखात, ई लर्निंगचे पद्धतीत वापरले जाणा-या वेगवेगळ्या प्रकारच्या शैक्षणिक साहित्याचे विकसन कसे करायचे याची माहिती करून घेऊया.
ह्या लेखमालेची आगळी वेगळी वैशिष्टे
संपादनह्या लेखमालेतील प्रत्येक लेखाचे “Online Version” खालील प्रत्येक संकेतस्थळांवर प्रत्येक विद्यार्थ्याकरिता निःशुल्क उपलब्ध असेल:
- www.swselearn.com Archived 2020-10-31 at the Wayback Machine.
- www.virtualuniversity.in Archived 2021-05-03 at the Wayback Machine.
- www.killedar.org Archived 2014-12-20 at the Wayback Machine.
वरील प्रत्येक संकेतस्थळ प्रत्येक शिक्षकास “Online Class” निर्माणा करीता पूर्णपणे निःशुल्क सेवा देते. ह्या “Online Version” खालील सुविधा पुरवतील:
- ह्या लेखाचे पूर्ण शैक्षणिक दृकश्राव्य अनुभव देणारे “SCORM or Video” मधील रूपांतर
- ह्या लेखासंदर्भात, मी आणि जगातील तुमचे इतर मित्र, यांच्यासोबत विचारपूर्वक चर्चा करण्यासाठी आणि आपल्या परखड विचारांसाठी “Discussion Forum” आणि थेट तात्काळ चर्चा करण्यासाठी “Chat Room”
- स्वतःच्या आकलनाचा अंदाज घेण्याकरीता स्वयं चाचणी आणि इतर खूप काही
एकदा तरी मित्रांसह आवर्जून अनुभव घेण्याची आग्रहाची विनंती.