मराठीमध्ये अनेक ई-साहित्य संमेलने होतात. त्यांतले एक युनिक फीचर्स नावाची संस्था भरवते. या संस्थेने आतापर्यंत भरवलेली ई-संमेलने.

  • पहिले ई-साहित्य संमेलन, ३१ डिसेंबर २०१० ते २ जानेवारी २०११, अध्यक्ष : रत्नाकर मतकरी[१]
  • दुसरे ई-साहित्य संमेलन, इ.स. २०१२, अध्यक्ष : कवी ग्रेस
  • तिसरे ई-साहित्य संमेलन, २० मार्च २०१३पासून, अध्यक्ष : भालचंद्र नेमाडे
  • चौथे ई-साहित्य संमेलन २४ मार्च २०१४ पासून पुढे दहा दिवस, अध्यक्ष ना.धों.महानोर
  • पाचवे ई-साहित्य संमेलन २६ मार्च २०१५पासून होत आहे. डॉ. अनिल अवचट संमेलनाध्यक्ष आहेत..

आणखी एक ई-साहित्य संमेलन

संपादन

२ ते १४ फेब्रुवारी २०१४ या कालावधीत ‘रेणुका आर्ट्‌स खुले ई साहित्य संमेलन’ झाले होते. रेणुका आर्ट्‌स'च्या मते सोशल नेटवर्किंग साईट्सच्या इतिहासातील हे ‘प्रथम ऑनलाईन साहित्य संमेलन’ होते. हे संमेलन अतिशय खेळीमेळीत व यशस्वीरीत्या पार पडले व त्याची दखल अनेक वृत्तपत्रे, तसेच ‘जय महाराष्ट्र’ या न्यूझ चॅनेलदेखील घेतली होती, असे सांगितले जाते..

२०१५ साली अशा प्रकारचे दुसरे संमेलन १ ते १३ फेब्रुवारी या कालावधीत झाले.

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "पहिल्या ई-साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रत्नाकर मतकरी यांच्याविषयी". युनिक फीचर्स. १ फेब्रुवारी २०१४ रोजी पाहिले.

बाह्यदुवे

संपादन

पहा : साहित्य संमेलने