इव्हान द टेरिबल

(ईव्हान द टेरिबल या पानावरून पुनर्निर्देशित)

इव्हान द टेरिबल (रशियन Ива́н Четвёртый, Васи́льевич​ [इवान चितव्योर्ती वसील्येविच]) ( २५ ऑगस्ट, १५३० - २८ मार्च, १५८४ []) हा रशियाचा पहिला झार होता. याने रशियन साम्राज्याचा विस्तार केला. याचा जन्म मॉस्कोजवळील मुस्कोव्ह येथे इ.स. १५३० मध्ये झाला.

इव्हान द टेरिबल

कारकीर्द

संपादन

वडिलांच्या मृत्यूनंतर वयाच्या तिसऱ्या वर्षी आयव्हन सत्तेवर आला, परंतु तेव्हा त्याच्या नावे त्याची आई आणि एक सल्लागार मंडळ कारभार पहात होते. वयाच्या सतराव्या वर्षी इव्हानने सत्तासूत्रे आपल्या हाती घेतली. इ.स. १५५२ मध्ये रशियाच्या विस्तारासाठी त्याने कझानचा पराभव केला. त्यानंतर चार वर्षांनी इ.स. १५५६ मध्ये अस्त्राखानचा पराभव केला. काही काळातच सायबेरियापर्यंत त्याने आपले साम्राज्य वाढवले. प्रस्थापित सरदारांच्या सल्लागारांचे वर्चस्व मोडून काढण्याच्या वेडात त्याने दहशतीचे राज्य निर्माण केले मात्र चोपन्न वर्षांच्या त्याच्या कारकिर्दीत रशियाचा झपाट्याने विस्तार झाला.

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "२८ मार्च : धिस डेट इन हिस्ट्री" (इंग्रजी भाषेत). 2009-10-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २५ एप्रिल, २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)