एलो गुणांकन पद्धत

(इ.एल.ओ. गुणवत्ता पध्दती या पानावरून पुनर्निर्देशित)

एलो गुणांकन पद्धत (इंग्लिश: Elo rating system) ही काही खेळांमधील खेळाडू अथवा संघाचा इतरांच्या तुलनेतील दर्जा किंवा गुणवत्ता ठरवण्यासाठी वापरली जाते. अर्पड एलो ह्या हंगेरीयन-अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञाने सर्वप्रथम बुद्धीबळ ह्या खेळासाठी ही पद्धत विकसीत केली.

ह्या प्रणालीमध्ये दोन विरुद्ध खेळाडूंच्या अथवा संघांच्या लढतीमधील विजेत्याचा अनुमान लावण्याकरिता त्यांच्या दर्जामधील फरक विचरात घेतला जातो. जर त्यांची क्रमवारी समान असेल तर प्रत्येकाला जिंकण्याची ५० टक्के शक्यता वर्तवली जाते. जर दोघांमध्ये १०० गुणांचा फरक असेल तर श्रेष्ठ खेळाडूची जिंकण्याची शक्यता ६४ टक्के व २०० गुणांचा फरक असेल तर ७६ टक्के वर्तवली जाते. प्रत्येक सामन्यानंतर एलो गुणांमध्ये बदल होतो. जर कनिष्ठ खेळाडूने श्रेष्ठ खेळाडूला नमवल्यास श्रेष्ठ खेळाडूच्या गुणांचा मोठा भाग कनिष्ठ खेळाडूला देण्यात येतो.

बुद्धीबळाव्यतिरिक्त फुटबॉल, मेजर लीग बेसबॉल इत्यादी सांघिक खेळांमध्ये देखील एलो पद्धत वापरली जाते.

हे सुद्धा पहा

संपादन