इ- बँकिंग म्हणजे “इलेक्ट्रॉनिक बँकिंग"होय. इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करून केला जाणारा बँक व्यवसाय म्हणजे इ- बँकिंग होय. जेव्हा बँक सेवा पुरवण्याच्या व्यवस्थेत माहिती तंत्रज्ञानाची अत्याधुनिक साधने वापरली जातात तेव्हा त्यास इ- बँकिंग असे म्हणतात. खात्याची चौकशी करणे, पैसे भरणे, पैसे काढणे, रकमेचे हस्तांतरण करणे यासारखे व्यवहार इ- बँकिंगमुळे तत्परतेने पार पडतात. इ- बँकिंगमुळे प्रत्येक वेळी ग्राहकांना बँकेत जाण्याची गरज पडत नाही. संगणकाद्वारे ग्राहक घरातून किंवा कचेरीतून व्यवहार करू शकतात.

ई बँकिंग मध्ये तुमची बँक तुम्हाला असे अधिकार देते ज्यात तुम्ही घरी बसल्या बँकेचे व्यवहार करू शकतात जसे बँक खतेची तपशील करणे, किती रक्कम आहे ते जाणून घेणे, मागील काही व्यवहार बघू शकतात, ऑनलाईन पैशांचे देवाण घेवाण करू शकता आणि इतर अनेक कामे जलद गतीने आणि कमी वेळेत करू शकतात.

इ-बँकिंगचे व्यवहार

संपादन

इ-बँकिंगद्वारे पुढील व्यवहार केले जातात.

  1. पैसे खात्यावर जमा करणे व पैसे काढणे.
  2. खाते उताऱ्याची प्रत मिळवणे.
  3. खात्याची अद्ययावत माहिती मिळवणे.
  4. धनादेश पुस्तिका, धनाकर्ष इत्यादी मिळवणे.
  5. ठेवी व कर्जावरील व्याजदर व इतर शुल्क यांची अद्ययावत माहिती मिळवणे.
  6. ग्राहकांच्या वतीने देणी देणे.
  7. ग्राहकांच्या विनंतीनुसार रकमेचे हस्तांतरण करणे.
  8. ग्राहकांच्या वतीने वीज बिल, टेलिफोन बिल इत्यादीचा भरणा करणे.

संदर्भ

संपादन
  1. दामजी बी. एच.(२०१६), आधुनिक बँकिंग, विद्या बुक्स पब्लिशर्स, औरंगाबाद.
  2. दामजी बी. एच.(२०१४), बँकिंग आणि वित्तीय बाजारपेठा, फडके प्रकाशन, कोल्हापूर