इस्ला मुहेरेस राष्ट्रीय विमानतळ
इस्ला मुहेरेस राष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: ISJ, आप्रविको: MMIM) मेक्सिकोच्या किंताना रो राज्यातील इस्ला मुहेरेस बेटावर असलेला छोटा विमानतळ आहे. या विमानतळावरून खाजगी विमाने, भाडोत्री विमाने तसेच सैनिकी विमाने येजा करतात. येथून कोणतीही व्यावसायिक प्रवासी विमानसेवा उपलब्ध नाही. येथून सगळ्यात जवळचा प्रवासी विमानतळ १३ किमी समुद्रापल्याड कान्कुन येथे आहे. येथे १,०४८ मी लांबीची डांबरी धावपट्टी आहे.