इस्लाम करिमोव

उझबेकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष

इस्लाम करिमोव (1938-2016) (उझबेक: Ислом Абдуғаниевич Каримов; रशियन: Ислам Абдуганиевич Каримов; ३० जानेवारी १९३८) हा मध्य आशियामधील उझबेकिस्तान देशाचा पहिला व विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. २४ मार्च १९९० रोजी करिमोव सोव्हिएत संघामधील उझबेक सोव्हिएत साम्यवादी गणराज्याचा प्रमुख बनला. ३१ ऑगस्ट १९९१ रोजी उझबेकिस्तानने स्वातंत्र्याची घोषणा केली. त्यानंतर घेण्यात आलेल्या उझबेकिस्तानमधील पहिल्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये करिमोव ८६ टक्के मते मिळवून निवडून आला परंतु अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांच्या मते ही निवडणुक अवैध होती.

इस्लाम करिमोव

उझबेकिस्तान ध्वज उझबेकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
२४ मार्च १९९०
पंतप्रधान अब्दुलहाशीम मितारोव
ओत्किर सुल्तोनोव
शौकत मिर्झियोयेव
मागील पदनिर्मिती

जन्म 1938.1.30
समरकंद, उझबेक सोसाग, सोव्हिएत संघ
मृत्यू 2016.9.2
पत्नी तातियाना करिमोवा
अपत्ये गुलनारा करिमोवा, लोला करिमोवा

१९९१ सालापासून करिमोवने उझबेकिस्तानमध्ये हुकुमशहाच्या थाटात सत्ता चालवली आहे. त्याच्या कारकिर्दीत मानवी हक्क, भाषणस्वातंत्र्य, व्यक्तीस्वातंत्र्य इत्यादींवर गदा आणली गेली आहे.[१]

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन
  1. ^ "Islam Abduganiyevich Karimov | 2022" (इंग्रजी भाषेत). 2022-12-21. Archived from the original on 2023-02-03. 2023-02-03 रोजी पाहिले.