इनबु
इनबु (जपानी: 稲 武 町) हे उत्तर-मध्य आयची प्रीफेक्चरमधील एक शहर आहे. हे जपानच्या डोंगराळ भागात आहे. जिफू प्रांता आणि नागानो प्रांताच्या सीमेस लागून असलेले हिगाशिकोमो जिल्ह्यात आहे.
इनबु
稲武町 | |
---|---|
माजी नगरपालिका | |
गुणक: 35°12′57.56″N 137°30′32.06″E / 35.2159889°N 137.5089056°E | |
देश | जपान |
भाग | चुबु टोकाई |
प्रांत | आयची प्रांत |
जिल्हा | हिगाशिकामो |
विलिनिकरण |
१ एप्रिल २००५ (सध्या टोयोटा शहराचा भाग) |
क्षेत्रफळ | |
• एकूण | ९८.३६ km२ (३७.९८ sq mi) |
लोकसंख्या (२००५) | |
• एकूण | २,९२८ |
• लोकसंख्येची घनता | ३०/km२ (८०/sq mi) |
वेळ क्षेत्र | UTC+०९:०० (जपानी प्रमाण वेळ) |
२००५ च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या २,९२८ आहे. त्याचे एकूण क्षेत्रफळ ९८.३६ चौरस किमी (३७.९८ चौ. मैल) आहे.
सुरुवातीच्या मेजी कालावधीच्या कॅडस्ट्रल सुधारणांमध्ये, इनाहाशी आणि बुसेत्सु ही गावे १ ऑक्टोबर १८८९ रोजी स्थापित केली गेली होती. १९४० मध्ये इनबू शहर दोन गावे एकत्र करून बनवण्यात आले. ३० सप्टेंबर २००३ पर्यंत हे शहर किताशितारा जिल्ह्यात होते, परंतु १ ऑक्टोबर २००३ ते ३१ मार्च २००५ पर्यंत हे शहर हिगाशिको जिल्ह्यात होते .
१ एप्रिल २००५ रोजी इनबु गाव इतर गावांसोबत म्हणजे फुजिओका, असुके आणि असाही गावासकट टोयोटा शहराच्या विस्तारीत भागात विलिन झाले. यामुळे याची स्वतंत्र नगरपालिका नाही.